yoga : योगाचा श्रीगणेशा लहानपणीच हवा

मानसिक स्वास्थ्यासाठी योगासने आवश्यक आहेत.
yoga
yoga sakal
Updated on

अहमदनगर : मानसिक स्वास्थ्यासाठी योगासने आवश्यक आहेत. आजारी असल्यानंतर व्यायामाचे महत्त्व अधिक जाणवते. मात्र, आजार होऊच नये यासाठी योगासने केल्यास अनेक धोके टाळता येतात. त्यामुळे विद्यार्थिदशेतच शास्त्रीय पद्धतीने योगासने शिकणे आवश्यक आहे. यापूर्वी मुलांसाठी उन्हाळी सुटीत संस्कार वर्ग होत असत. आता मात्र खास योगवर्गही सुरू होत आहेत.

कंबरदुखी, पाठदुखी, गुडघे, हाडांचे दुखणे किंवा मानसिक अस्वास्थ्यामुळे अनेकदा डॉक्टर योगासने करण्याचा सल्ला देतात. रुग्णांना तेवढ्याच योगासनांचे प्रशिक्षणही ओपीडीच्या ठिकाणी दिले जाते. रुग्ण तात्पुरती ती आसने करतात; परंतु बरे वाटल्यानंतर पुन्हा बंद करतात. योगासने हा नियमित करण्याचा विषय आहे. ज्याप्रमाणे नियमित व्यायाम आवश्यक असतो, त्याचप्रमाणे योगासने, प्राणायाम नियमित करण्याची गरज असते.

याची सवय लहानपणीच व्हायला हवी. पूर्वी शालेय जीवनात सकाळी शारीरिक कसरती केल्या जायच्या. आजही काही शाळांमधून नियमित होतात. मात्र, काही शाळांमध्ये प्रार्थना झाल्यानंतर लगेचच तासिका सुरू होतात.

उन्हाळी सुटीत मुलांनी नवीन काही तरी शिकावे, असे अनेक पालकांना वाटते. संगीत, नृत्य, गायन, हस्ताक्षर, क्रिकेट, फुटबॉल, पोहणे असे खेळ व कला शिकण्याकडे अनेकांचा कल असतो. तथापि, कायम कामी येणारी योगासनेही शिकणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

योग विद्याधामतर्फे विद्य‍ार्थ्यांसाठी वर्ग

नगरच्या योग विद्याधाम (योग भवन, सावेडी) येथे १७ एप्रिलपासून सकाळी सात ते आठ व संध्याकाळी सहा ते सात या वेळेत माध्यमिक शाळा वयोगटातील मुला-मुलींसाठी चैतन्य योग संस्कार आणि उंचीसंवर्धन वर्गाचे आयोजन करण्य‍ात आले आहे. मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य कुठल्याही आपत्तीला तोंड देण्यास सक्षम असावे,

अभ्यासात एकाग्रता वाढावी, मुलांनी बाहेरच्या जगात आत्मविश्वासाने वावरावे, आजच्या स्पर्धात्मक युगातील यश आणि अपयशाला समत्वभावाने सामोरे जावे, यासाठी त्य‍ांना योगविद्येची गोडी लावण्यासाठी या वर्गाचे आयोजन केले आहे. या वर्गांत शास्त्रशुद्ध सूर्यनमस्कार, लहान मुलामुलींना सहजपणे करता येतील आणि आवडतील, अशी प्राथमिक योगासने, ओंकारसाधना, असा योगाभ्यास खेळीमेळीच्या वातावरणात शिकवला जातो.

‘सकाळ’मधून प्रबोधन

‘सकाळ’मध्ये ‘स्वास्थ्यम्’ सदरात रोज योगासनांबद्दल माहिती प्रसिद्ध केली जाते. त्याचा फायदा मुलांना चांगला होत आहे. याबाबत पालकांतून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. हे वाचून अनेक मुले स्वतः प्रात्यक्षिके करीत आहेत. त्यामुळे त्यांना दैनंदिन योगासनांची सवय लागत आहे.

योग विद्याधामच्या वतीने आरोग्य उत्तम राहावे यासाठी योगानाच्या शिबिरांचे नेहमीच आयोजन केले जाते. उन्हाळ्याच्या सुटीत लहान मुलांसाठी योगासनांचे वर्ग आयोजित केले आहेत. त्यामध्ये संस्कारांचे धडेही दिले जातात. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.

- डॉ. सुंदर गोरे, अध्यक्ष, योग विद्याधाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()