Zika Virus: काळजी घ्या! झिकासारख्या विषाणूजन्य आजाराचा वाढत आहे प्रादूर्भाव.

The director of health department reached Sangamner and inspected the areal: आजाराबाबतची लक्षणे आढळून आल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत; तालुका आरोग्य अधिकारी.
Health department of sangamner
Health department of sangamnersakal
Updated on

Sangamner: तालुक्यामध्ये 25 मे रोजी पहिला झिका विषाणूजन्य आजाराचा रुग्ण आढळून आला होता. उपचार घेऊन हा रुग्ण बरा झाला. त्यानंतर या भागात आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. गुरुवारी (ता. 18) शहरात दोन रुग्ण आढळून आले. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून, थेट आरोग्य विभागाचे संचालक संगमनेरात दाखल झाले अन् त्यांनी परिसराची पाहणी केली.

रुग्ण सापडलेल्या भागामध्ये आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षणामध्ये झिका विषाणूजन्य आजार असलेल्या भागात प्रामुख्याने ताप, डोळे लाल होणे, सांधेदुखी, डोकेदुखी, अंगदुखी व अंगावर लाल पुरळ येणे, अशी सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्तींची तपासणी केली जात असून, त्यांना संदर्भित करण्याची कार्यवाही सुरू आहे. सौम्य लक्षणे दिसत असली, तरीही गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे गर्भवती महिमध्ये होणाऱ्या बाळास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामध्ये डोके लहान असणे, मेंदूची वाढ खुंटणे किंवा डोळ्यांचे विकार, ऐकू न येणे, अवयवांचे जन्मतः व्यंगत्व होण्याची शक्यता असते.

Health department of sangamner
Sharad Pawar: शेतकरी त्यांच्या मागणीसाठी संघर्ष करीत असताना सुद्धा सरकार त्यांना न्याय देण्यात अयशस्वीच..!

स्वाईन फ्ल्यूचा तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात एक व घारगावअंतर्गत एका गावात एका रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, साथरोग अधिकारी डॉ. कोकरे, हत्तीरोग अधिकारी डॉ. हायलिंगे, अतिरिक्त हिवताप अधिकारी डॉ. सांगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी संगमनेर तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आशा स्वयंसेविकांची बैठक घेऊन सर्व संबंधित यंत्रणांना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

नागरिकांनी घाबरून न जाता आजाराबाबतची लक्षणे आढळून आल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. तसेच आरोग्य यंत्रणेला सहकार्य करून राबविल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक योजनांचा अवलंब करावा.

- सुरेश घोलप, तालुका आरोग्य अधिकारी

Health department of sangamner
Sharad Pawar: पवारांनी भाकरी फिरवली! विधानसभेचा उमेदवार ठरला ? रोहित पाटलांपाठोपाठ आणखी एका तरुणाला देणार संधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.