गट व गणरचनेत नेत्यांची मिलीभगत

श्रीगोंद्यातील वारसदारांच्या उमेदवारीची चर्चा जोरात, कार्यकर्ते वाऱ्यावर
Ahmednagar Zilla Parishad
Ahmednagar Zilla Parishadsakal
Updated on

श्रीगोंदे : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणांची पुनर्रचना होत आहे. श्रीगोंद्यात एक गट व दोन पंचायत समिती गण वाढत आहेत. त्यासाठी तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी कच्चा आराखडा तयार केला आहे. मात्र, आराखडा नेत्यांच्या सोयीने तयार झाल्याची मोठी चर्चा आहे. त्यासाठी बहुतेक नेत्यांनी त्यांच्या हिशेबाने रचना केल्याचे बोलले जाते.

दरम्यान, अजून गटरचना प्रत्यक्षात आली नसतानाच, नेत्यांच्या घरांतील इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केल्याने, या रचनेत मिलीभगत असून, नेत्यांचे वारसदार उमेदवार आणि कार्यकर्ते पुन्हा एकदा प्रचारक राहणार आहेत. श्रीगोंद्यात सहा जिल्हा परिषद गटांचे सात व बारा पंचायत समिती गणांचे चौदा गण होत असल्याने, गावांची अदलाबदल होणार आहे. शिवाय, नव्या गटांची व गणांची वाढ ही अनेक राजकीय नेत्यांना डोकेदुखी, तर काहींना फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे जवळपास सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी यात जातीने लक्ष घातले होते.

तहसीलदार कुलथे यांना येथे येऊन जास्त काळ झाला नसल्याने, त्यांना राजकीय अंदाज आला नाही. त्यांना नेत्यांना विश्वासात घेणे भागच होते. मात्र, नेत्यांसह त्यांच्या जवळच्या काही कार्यकर्त्यांनी ही संधी असल्याचे मानत आपल्या सोयीची रचना तयार करून दिल्याचे पुढे आले. एका नेत्याने, आपल्याही हिशेबानुसार रचना करा, असा निरोप यंत्रणेला दिल्याचे समजते. त्यामुळे सगळ्यांच्याच सोयीचे कसे करता येईल, हे पाहिल्याची चर्चा सध्या सोशल मीडियात आहे. त्यातच गटांचे तीन ते चार नकाशे कार्यकर्त्यांनी सोशल मीडियात मध्यंतरी टाकल्याने गोंधळ उडाला होता. त्यामुळे नेत्यांच्या सोयीची रचना केल्याची चर्चा वाढली.

कोण कुठून लढणार...

आमदार बबनराव पाचपुते यांच्या घरातील व्यक्ती काष्टी गटातून उमेदवार राहील. नव्याने होणाऱ्या लिंपणगावमधून नागवडे कुटुंबातील व्यक्ती लढेल. पिंपळगाव पिसेमधून डॉ. प्रणोती जगताप उमेदवारी करणार आहेत. कोळगाव गटात राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांच्या घरातील व्यक्तीला संधी मिळणार असल्याचे सांगितले जाते. मांडवण गटात जगताप कुटुंबातील व्यक्तीच उमेदवार असेल, असे बोलले जाते.

नेत्यांशी चर्चा केली. मात्र, त्यांच्या सूचना घेतल्या आहेत. रचना नियमानुसारच होईल.

- मिलिंद कुलथे, तहसीलदार, श्रीगोंदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()