अहमदनगर : बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ५२ कोटी रुपये

मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडून मंजुरी; शेतकऱ्यांना मिळणार लाभ
shankar gadakh
shankar gadakhsakal
Updated on

नेवासे : मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत  अहमदनगर जिल्ह्यातील(ahmednagar district) २७४ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी सुमारे ५२ कोटींचा निधी राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख पाटील(Water Conservation Minister Shankarrao Gadakh Patil) यांनी मंजूर केला आहे. लवकरच ही कामे सुरू होणार आहेत. जिल्ह्यातील उर्वरित बंधाऱ्यांसाठीही(Water dam) टप्प्याटप्प्याने निधी मिळणार आहे.

shankar gadakh
अहमदनगर : गिते यांच्या व्यसनमुक्तीच्या कामाची थोरातांकडून दखल

मागील एक-दीड वर्षापासून मंत्री गडाख(minister gadakh) शिवसेना शाखांची उद्‍घाटने, तसेच पक्ष वाढविण्यासाठी जिल्हा दौरा करीत आहेत. यावेळी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी बंधारे नादुरुस्त असल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर त्यांनी या बंधाऱ्यांच्या सर्वेक्षणाच्या सूचना संबंधितांना दिल्या होत्या. तसेच, जिल्ह्यातील सर्व बंधारे दुरुस्त केले जातील, असे आश्‍वासनही दिले होते. त्याप्रमाणे बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला आहे.

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेच्या मूळ आराखड्यात अहमदनगर जिल्ह्यातील ४६९ योजना समाविष्ट आहेत. या योजनांमुळे १३ हजार २२८ हेक्टर सिंचन क्षेत्र व ५८ हजार ४२२.२५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा पुनर्स्थापित होणार आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ (Irrigation benefits)मिळणार आहे. त्यातील ३८६ योजनांना मान्यता मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()