Ajit Pawar Latest Update : राष्ट्रवादीतील महाभारत नेत्यांसह कार्यकर्तेही 'वेट अ‍ॅण्ड वॉच'च्या भूमिकेत; ठाकरेंच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष

Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on

Washim Political News : राज्याच्या राजकीय पटलावर गेल्या पंचवीस वर्षात शरद पवार यांच्या करिष्म्यावर चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. या पाश्र्वभूमीवर वाशीम जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र अजूनही आपली भूमिका स्पष्ट केली नाही.

जिल्ह्यात माजी मंत्री सुभाषराव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे काय भूमिका घेतात यावरच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

लोकशाही पूरक परंतु एकाच आदेशावर चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील राजकारणात चांगलाच जम बसविला असताना अजित पवार यांनी बंडाचे निशाण फडकावत भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

Ajit Pawar
NCP Political Crisis : नक्की आदेश कोणाचे पाळायचे पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम; बडतर्फीचा आदेश देणारेच निलंबित

वाशीम जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील टक्केवारी सर्वाधिक आहे. तसेच शरद पवार व अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात आहे.

या फुटीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले असताना अनेक नेत्यांनी सध्या आपली भूमिका स्पष्ट केली नाही. अनेक जण शरद पवार व अजित पवार यांच्या बैठकीनंतर निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्या सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्हा परिषद अध्यक्षपद आहे. बाजार समित्या तसेच पंचायत समित्यांमधे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. या पक्षाची दोन शकल॓ झाली तर सहाजिकच पक्षाची ताकद विभागली जाणार आहे.

जिल्हाध्यक्ष पक्षासोबत

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांची भूमिका तळ्यात मळ्यात आहे. आपण पक्षासोबत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

घड्याळ चिन्ह ज्यांच्याकडे असेल त्यांच्या सोबत आपण राहणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली असली तरी ते अजित पवार यांच्याकडेच झुकतील असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar: शिवसेनेचे नाव अन् चिन्ह कोणाचे? अजित पवारांनी दिला 'त्या' सभेचा संदर्भ

डहाके शरद पवारांसोबत

कारंजाचे माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके यांना विचारणा केली असता आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव पाटील खडसे, दिलीप जाधव यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता वाट पहा चे धोरण अवलंबिले तर माजी जिल्हाध्यक्ष पांडुरंग ठाकरे संपर्क क्षेत्राबाहेर होते.

माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव पाटील खडसे व पांडुरंग ठाकरे हे शरद पवार यांच्या विश्वासू वर्तुळातील असून ते काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

ठाकरेंची भूमिका काय?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच माजी मंत्री सुभाषराव ठाकरे हे राष्ट्रवादीच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत आले आहेत. पक्षाला जनाधार मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

तसेच त्यांचे पुत्र चंद्रकांत ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष असून जिल्हा परिषदेचे अध्यक्षही आहेत. चंद्रकांत ठाकरे यांच्या संघटन कौशल्यानेच जिल्हा परिषदेत पक्ष एक नंबरवर गेला आहे. या ठाकरे पिता पुत्राच्या भूमिकेवरच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.