बुलडाणा : १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर लैंगीक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीची आरोपीच्या ताब्यातून सुटका करण्यात आली असून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुरुवार १५ ऑगस्ट रोजी रायपूर पोलिसांनी ही कारवाई केली.