Akola Dengue Update : सावधान! अकोला शहरात डेंग्यूचे १५ रुग्ण सक्रिय; आरोग्य यंत्रणा अलर्ट

Akola Latest news in Marathi : अकोला शहरात डेंग्यूचे १५ रुग्ण सक्रिय असून, आतापर्यंत ६५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
Dengue
DengueSakal
Updated on

अकोला : शहरात आठवभरापासून अधूनमधून रिमझिम तर कधी चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. याचा परिणाम म्हणून डासांची उत्पत्ती होत असून साथीचे रुग्ण वाढले आहेत. सर्दी, ताप, खोकल्याचे घरोघरी रुग्ण आवळून येत असून, शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे.

विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिकांचा त्रास वाढला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर असून, डेंगी, चिकनगुष्या, झिकाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अकोला शहरात डेंग्यूचे १५ रुग्ण सक्रिय असून, आतापर्यंत ६५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

महापालिका प्रशासनाने दाट लोकवस्तीतील नागरिकांच्या रक्ताचे नमुने डेंग्यूच्या पार्श्र्वभूमीवर घेण्यासाठी पथके गठीत केली आहेत. शिवाय डेंग्यू, चिकुनगुनीया, झिका हे कीटकजन्य आजार व गॅस्ट्रो, कावीळ, कॉलरा, अतिसार या सारख्या जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

शहरात घरोघरी जाऊन फवारणी केली जात असून, पाण्याची साठवण केलेले हौद, टाक्यांची तपासणी केली जात आहे. ज्याठिकाणी डास अळ्या आढळून आल्या तेथील पाणीसाठे रिकामे केले जात आहेत; तसेच डास अळ्या नष्ट करण्यासाठी महानगरपालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुप चौधरी यांनी केले आहे.

मुलांची काळजी घ्या

सध्या साथीचे रोग झपाट्याने वाढत आहेत. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांच्यावर लवकर ॲटक होतो. त्यामुळे मुलांच्या डब्या ताजे अन्न व बाटलीत उकळलेले पाणी द्या, पावसापासून संरक्षणासाठी छत्री, रेनकोट सोबत द्यावी, आजारी असल्यास शाळेत पाठवू नका. तसेच घरीच उपचार न करता डॉक्टरांकडे घेऊन जावे, अतिसार झाल्यास ओआरएसचे पाणी द्या, आजारपणात गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांना नेणे टाळावे.

नागरिकांनी काय करावे

  • डेंग्यू, चिकुनगूनीया, झिका हे विषाणूजन्य आजार आहेत.

  • हे आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतात.

  • हा डास साठवलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. त्यामुळे डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करावित.

  • आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा.

  • कूलर, मनी प्लॅटमधील पाणी बदला.

  • आजारपणात गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे

अकोला शहरात डेंग्यूचे १५ रुग्ण सक्रिय आहेत. नागरिकांनी घरात व परिसरात पाणी साचलेली भांडी रिकामी करावीत, घराच्या परिसरात डासांची उत्पत्ती होऊ नये याची काळजी घ्यावी.

-डॉ.नितीन गायकवाड, साथरोग विभाग, महानगरपालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.