अकोला : जिल्ह्यात एक जानेवारीपासून कोरोना बाधितांची(increasing covid patients) संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना बाधितांची सर्वत्र संख्या वाढत असल्याने कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्याची शक्यता सुद्धा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. असे असले तरी जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची(vaccination) गती मंदावल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांचा कालावधी जवळ आल्यानंतर सुद्धा ते दुसरा डोस घेण्यास काणाडोळा करत असल्याचे वास्तव आहे. त्यांची ही हलगर्जी इतरांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
कोरोना विषाणू(corona) विरोधातील लढ्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला विशेष महत्व आहे. पहिल्या लाटेनंतर लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आतापर्यंत आरोग्य विभागामार्फत नागरिकांच्या लसीकरणावर जोर देण्यात येत आहे. अधिकाधिक नागरिकांनी लस घ्यावी यासाठी नागरिकांना लस सुद्धा मोफत देण्यात येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लस घेणाऱ्यांवर विषाणूचा हल्ला झाल्यानंतर सुद्धा लसवंतांना फारसा प्रभाव न झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणने आहे. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत लसीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान ओमिक्रॉन व्हेरियंटचा वाढता धोका व कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता घेता सदर लाट थोपवण्यासाठी लसीकरण हाच एकमात्र उपाय असल्याचे सांगितल्या जात आहे.
त्यामुळे लसीकरणाची गती वाढवण्यासाठी व अधिकाधिक नागरिकांना लस मिळावी यासाठी मिशन कवच कुंडल अभियानानंतर आता केंद्र सरकारने लसीकरणाची व्याप्ती वाढवली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी दुसरा डोस घेणारे निर्धारित कालावधीत लस घेण्यासाठी काणाडोळा करत असल्याने वास्तव आहे.
‘प्रतिबंधात्मक डोस’ची तयारी
पंतप्रधान मोदी यांनी १० जानेवारी पासून फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठांना प्रतिबंधात्मक डोस देण्याचेही जाहीर केले आहे. त्यानुसार साठीपार केलेल्या ज्येष्ठांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक डोस घेता येईल. त्यामुळे पुढील महिन्यात पुन्हा एकदा लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळण्याची शक्यता अधिक आहे. त्यासाठीचे नियोजन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
मुलांसाठी लसीकरण केंद्र वाढवले
जिल्ह्यात ३ जानेवारी पासून १५ ते १८ वयोगटातील युवकांचे लसीकरण करण्यात येत आहे. सुरुवातीला केवळ ११ केंद्रांवर सदर लसीकरण करण्यात आले. परंतु लसीकरण केंद्रांमध्ये आता कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता वाढ करुन ४० करण्यात आली आहे. त्यापैकी पाच केंद्र हे महापालिका क्षेत्रात तर ३५ केंद्र ग्रामीण क्षेत्रात आहेत. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
अशी आहे लसवंतांची स्थिती
वयोगट लसवंत
६० वर्षावरील ३,३५,०६८
१८ ते ४४ ९,५५,२६९
४५ ते ६० ४,५०,१५७
१५ ते १७ १५, ८६५
जिल्ह्यातील एक लाख ४० हजार नागरिकांचा दुसऱ्या डोससाठी कालावधी आहे. संबंधित नागरिकांनी दुसरा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर जावे. त्यासोबतच ज्यांनी अद्याप डोस घेतला नसेल त्यांनीही पहिला डोस घ्यावा.
- डॉ. मनीष शर्मा
जिल्हा लसीकरण अधिकारी, अकोला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.