अकोला :आजच्या युगात इंटरनेट हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. इंटरनेट माध्यमाने मानवी जीवन सुलभ झाले आहे. मात्र या माध्यमातून मिळणारे प्रलोभन व आमिषाला बळी पडून अनेक जण आर्थिक अडचणीत येतात. ऑनलाइन पद्धतीने फसवणूक झालेल्या नागरिकांचे १९ लक्ष रुपये संबंधितांना अकोला सायबर से विभागाने परत केली असून ३३ लक्ष ७२ हजार रुपये हे होल्ड करण्यात आले आहे.
ऑनलाइन आर्थिक व्यवहार करणे जेवढे सोईचे सोपे वाटत आहे तेवढेच ते आता दिवसेंदिवस अडचणीचे ठरत आहे. अपुऱ्या ज्ञानाचा सायबर गुन्हेगार फायदा उचलत असून उणीवांचा फायदा उठवून इतरांचे आर्थिक व सामाजिक नुकसान करतात. त्यामुळे इंटरनेटचा वापर सुरक्षितरित्या करणे हि काळाची गरज आहे.
सध्या सोशल मिडीयावर बनावट अकाउंटवरून शेअर मार्केटमध्ये जास्त नफा मिळविल्याबाबतचे विविध जाहिराती, व्हिडीओ दाखवुन नागरिकांना प्रलोभन दाखविले जाते अशा प्रकारच्या जाहिरातला बळी पडुन अनेक जणांची फसवणुक करण्यात येत आहे. अशाप्रकारच्या फसव्या जाहिरातीला प्रतिसाद देणे टाळावे. अशा प्रकारच्या कोणत्याही अनोळखी सोशल मिडीयावरील अकाउंटला खात्री केल्याशिवाय प्रतिसाद देवु नये. तसेच टेलीग्रामवर बरेच तरूण-तरूणी पार्टटाईम जॉब, जॉबला बळी पडत आहेत यामध्ये टिकीट बुक करणे, इझी मनी, गुगल अॅड रिद्ध, मनी ट्रान्सफर अशा टाक्सच्या नावावर काहि दिवस रक्कम वापरण्यास दिली जाते त्यानंतर फी स्वरूपात पैशांची मागणी करून रिफंडच्या नावावर फसवणुक केली जाते. त्याचप्रमाणे बँकेचे ग्राहक सेवा प्रतिनीध केवायसी अपडेट करण्याच्या नावावर तर कधी आपल्याकडे थकीत असलेल्या इलेक्ट्रिक बिलापोटी आपले वीज कनेक्शन बंद होणार असल्याची धमकी देऊन आर्थिक फसवणुक केली जाते.
माहे जानेवारी २०२४ पासून ते आतापर्यंत सायबर पोलीस स्टेशन, अकोला यांनी अशा प्रकारच्या विविध ऑनलाईन आर्थिक फसवणुकीतील एकुण १८ लक्ष ९८ हजार ५२५ रूपये रक्कम नागरिकांना परत करण्यात यश मिळविले .तसेच ३३ लक्ष ७२ हजार ३३६रूपये रक्कम सायबर पोलीस स्टेशन, अकोला कडुन होल्ड करण्यात आली आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, यांच्या मार्गदर्शनात पो. नि. शंकर शेळके व सर्व सायबर पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार यांनी केली.
पोलिसांनी केले आवाहन
नागरिकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, आपल्या बँक खात्यांविषयी, केडीट कार्ड किंवा एटीएम. कार्डची वैयक्तीक माहिती कोणालाही फोनद्वारे देवु नये. कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंक, अथवा अॅप्लीकेशन कोण्या व्यक्तीचे सांगणे प्रमाणे डाउनलोड करू नये सिम कार्ड अपडेट अथवा केवायसी अपडेट आणि इलेक्ट्रिक बिल भरण्याच्या नावाखाली आलेल्या संदेशाला प्रतिसाद देवु नका. ओ.एल.एक्स. सारख्या अॅपवरून अनओळखी व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करतांना शहानिशा करूनच आर्थिक व्यवहार करावा. अशाप्रकारच्या फसव्या प्रकारा पासुन सावध रहावे. तरी आपली ऑनलाईन आर्थिक फसवणुक झाल्यास तात्काळ सायबर सेलच्या१९३० किंवा website: cybercrime.gov.in वर तक्रार करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.