Barsi Takli Rain News : एकाच रात्री वाढला २१ टक्के जलसाठा! काटेपूर्णा प्रकल्पाची पाणी पातळी ७० टक्के

दुधाळी भरून वाहत असलेल्या नदी प्रवाहातून येणाऱ्या पाण्याची आवक अशीच सुरू राहिल्यास व प्रकल्पाच्या रेकॉर्ड प्रमाणे ता.३१ जुलै रोजी पाणी पातळी ८० टक्यांच्या वर गेल्यास प्रकल्पातील पाण्याचा विर्सग करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
21 percent water storage barsi takli Water level of Katepurna project is 70 percent akola monsoon
21 percent water storage barsi takli Water level of Katepurna project is 70 percent akola monsoonsakal
Updated on

बार्शीटाकळी : तालुक्यातील काटेपूर्णा जल प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात ता. ३० जुलैच्या मध्यरात्री दमदार पावसाने हजेरी लावल्याने काटेपूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे काटेपूर्णा प्रकल्पातील पाणीसाठ्यात एकाच रात्री १८ टक्के वाढ झाली असून, ता. ३१ जुलै रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान प्रकल्पाची पाणी पातळी ७० टक्के एवढी झाली आहे.

बार्शीटाकळी तालुक्यातील मोठा जल प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या व अकोला शहरासह बोरगाव मंजू, मूर्तिजापूर, खांबोरा पाणीपुरवठा योजनेच्या ६४ गाव खेड्यांची वर्षभर तहान भागविणाऱ्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात ता. ३० जुलै रोजीच्या मध्यरात्री ६९ मिमी. पावसाची नोंद झाली. मुसळाधार पावसाने काटेपूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे प्रकल्पातील पाणी पातळी एका रात्रीत चार फुटाने वाढली असून, पाणी पातळी ४८.९९ टक्यावरून ७० टक्के एवढी झाली आहे.

प्रकल्पाचे पाच व्हॉल्व पाण्याखाली गेले आहेत. काटाकोंडला नदी प्रवाहाच्या मार्गावरील व पाणलोट क्षेत्रातील बारा लहान तलाव, पाझर तलावासह सुंकडा, कुरळ, मसला, कोल्ही, रिधरा, मालेगाव, खडकी, कुत्तर डोह, सुधी, डव्हा आणि चाकतिर्थ असे बारा लहान तलाव पूर्ण भरल्याने नदीच्या प्रवाहात वाढ झाली आहे.

21 percent water storage barsi takli Water level of Katepurna project is 70 percent akola monsoon
Old Pension Scheme : जुन्या पेंशनसाठी पुन्हा आंदोलनाचे हत्यार; आजपासून शिक्षकांचे बेमुदत आंदोलन

दुधाळी भरून वाहत असलेल्या नदी प्रवाहातून येणाऱ्या पाण्याची आवक अशीच सुरू राहिल्यास व प्रकल्पाच्या रेकॉर्ड प्रमाणे ता.३१ जुलै रोजी पाणी पातळी ८० टक्यांच्या वर गेल्यास प्रकल्पातील पाण्याचा विर्सग करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मात्र, ता. १ ऑगस्ट रोजी प्रकल्पाची पाणी पातळी ८५ टक्यांपर्यंत ठेवावी लागते, जूनमध्ये पाणलोट क्षेत्रात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झाली नसल्याने अकोला शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या नजरा काटेपूर्णा प्रकल्पाकडे लागल्या होत्या.

गत काही दिवसांपासून मालेगाव, जुऊळका, काटा, धानोरा परिसरात संततधार व जोरदार पावसाने पाणी पातळीत टप्या टप्याने लक्षणीय वाढ झाली असल्याने शेती सिंचनासाठी सुद्धा फायदा होणार आहे.

21 percent water storage barsi takli Water level of Katepurna project is 70 percent akola monsoon
Akola : स्थायीच्या सभेत उपाध्यक्ष-शिवसेना सदस्यांत जुंपली; उपाध्यक्षांनी ग्रा.पं.च्या विकास कामाची फाईल रोखल्याचा आरोप

अधिकाऱ्यांनी काढली रात्र जागून

वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने शाखा अभियंता ऋषिकेश इंगोले व उपकार्यकारी अभियंता विशाल कुळकर्णी, मनोज पाठक व इतर कर्मचाऱ्यांनी धरणातील वाढणाऱ्या पाणी पातळीवर लक्ष ठेवून रात्र जागून काढली.

आताची टक्केवारी जास्तच

गत वर्षी ता. ३० जून रोजी प्रकल्पातील पाणी पातळी ६०.६७ एवढी होती. त्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा ७० टक्के असून, ९.७७ टक्यांनी शिल्लक आहे. काटेपूर्णा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रामधील वाघा, जांभरून, कोथळी, देवदरी या गावांकडील व प्रकल्पाच्या क्षेत्रात असलेल्या टेकड्या पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहेत.

काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर वाढला असून, पाणी पातळीत होणारी लक्षणीय वाढ पाहता काटेपूर्णा नदीपात्रात कधीही आवश्यकतेनुसार विसर्ग होऊ शकतो. काटेपूर्णा नदी काठावरील महान, चिंचखेड, निभांरा, तामशी, दोंड (बु.), दोंड (खु.) या गावांच्या सरपंचासह सर्व ग्रामस्थांनी नदीपात्रात उतरू नये तसेच नदीपात्रातील पंप, अवजारे अथवा तत्सम साहित्य, पाळीव जनावरे हलविण्यात यावी.

- ऋषिकेश इंगोले, शाखा अभियंता, काटेपूर्णा प्रकल्प व्यवस्थापन, महान.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()