अकोला - गत २४ तासात जिल्हयातील ७ मंडळात झालेल्या अतिवृष्टीने सुमारे ४२ हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाले असून यामध्ये अकोला तालुक्यातील सुकोडा येथील दशरथ नारायण गायकवाड (५५) यांचा ३ सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास नदीत पाय घसरून वाहून गेल्याने मृत्यू झाला. तर जिल्ह्यात ८२ घरांचे अंशत: नुकसान झाले. पातूर तालुक्यातील १६ मोठी व ५ लहान अशी २१ जनावरे दगावल्याची माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली आहे.