नुकसानग्रस्तांसाठी ५४ कोटी ७२ लाखांची मदत

शासन निर्णय जाहिर झाल्याने नुकसानग्रस्तांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
akola
akolasakal
Updated on

अकोला : जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात उद्‍भवलेल्या पुरस्थितीमुळे मृत जनावरांसाठी मदत, पूर्णतः नष्ट, अंशतः पडझड झालेली कच्ची, पक्की घरे, झोपडी, गोठे, दुकानदार, टपरीधारक, कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी मदत व इतर अनुज्ञेय बाबींसाठी जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी ५४ कोटी ७२ लाख १७ हजार रुपयांचा मदत निधी शासनाने जाहीर केला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने जारी केला असल्याने नुकसानग्रस्तांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्यात २१ जुलैच्या रात्री ७ वाजतापासून एकसारखा पाऊस कोसळला होता. पावसाचा जोर रात्री २ वाजेपर्यंत कायम राहिल्याने नदी-नाल्यांना पूर आला होता. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २६ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील ३९९ गावे बाधित झाली होती. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांचे कपडे, घरातील साहित्य, अन्न धान्य व इतर नुकसान झाले होते.

नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी उद्भवलेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना, मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना, जखमी व्यक्तींना तातडीने मदत देणे आवश्यक असल्याने नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. नुकसानग्रस्तांसाठी आवश्यक असलेल्या मदत निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी ५४ कोटी ७२ लाख १७ हजार रुपयांचा मदत निधी जाहीर केला आहे. त्यासाठीचा शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात आला आहे.

akola
ओबीसींच्या डोळ्यात किती धुळ फेकणार; रेखाताई ठाकूर यांचा सवाल

घरांची पडझड झालेल्यांना मिळणार नुकसान भरपाई

अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील १० हजार २३६ घरांचे नुकसान झाले होते. त्यापैकी ९ हजार ९६५ घरांचे अंशत: तर २७१ घरांचे पूर्णत: नुकसान झाले होते. त्यामध्ये अकोला तालुक्यातील ८४०० घरांचे अंशत: तर २२० घरांचे पूर्णत: नुकसान झाले होते. घरे पूर्णतः क्षतिग्रस्त झालेल्यांसाठी शासनाने २ कोटी ५६ लाख ५ हजार तर अंशतः पडझड झालेली कच्ची पक्की घरे, नष्ट झालेल्या झोपड्या व गोठ्‍यांसाठी १८ कोटी ९९ लाख ६२ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

शेती खरडून गेलेल्यांसाठी ३१ कोटींची मदत

जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी काठी असलेल्या शेतीचे मोठ्‍या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यासोबत काही शेतांमध्ये पावसाचे पाणी सुद्धा साचले होते. जोरदार पावसामुळे अकोट तालुक्यातील दोन हजार ७२५.८१ हेक्टर आणि बाळापूर तालुक्यातील एक हजार ५२४ हेक्टर अशी एकूण चार हजार २४९.८१ हेक्टर शेत जमीन खरडून गेली. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांसाठी एसडीआरएफच्या दराने ८ कोटी ५६ लाख ६ हजार तर वाढीव दराने मदत देण्यासाठी १० कोटी ४३ लाख ५६ हजार रुपये अशी एकूण १८ कोटी ९९ लाख ६२ हजार रुपयांची मदत शासनाने जाहीर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.