Amol Mitkari Attack Case : अमोल मिटकरी हल्लाप्रकरणी ९ आरोपींना अटक; सहा आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्य विधान केल्या संदर्भात संत झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हलवून तोडफोड केली
9 accused arrested in Amol Mitkari attack case one day police custody for six accused
amol mitkariSakal
Updated on

अकोला : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्य विधान केल्या संदर्भात संत झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हलवून तोडफोड केली होती याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली आहे . गुरुवारी अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

मंगळवारी विधान परीषद सदस्य अमोल मिटकरी हे विधी मंडळ कामकाज संदर्भातील कागदपत्राचा आढावा तसेच शेतक-याचा प्रश्न सोडवायला शासकीय विश्राम गृह अकोला येथे हजर असतांना विश्रामगृहामध्ये मनसे विधानसभा निरीक्षक यांनी स्थानिक व काही बाहेरचे पुरुष तथा महिला ४० ते ५० लोकांनार हल्ला करायची चिथावणी देवुन नारेबाजी करीत दगड व कुंड्या हातात घेवुन शिवीगाळ केली तसेच आ.अमोल मिटकरी यांना धमक्या देवुन त्यांचे वाहनावर दगड व कुंड्या मारून गाडीचे काच फोडुन नुकसान केले. याप्रकरणी आमदार मिटकरींच्या तक्रारीवरून संबधितांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते.

9 accused arrested in Amol Mitkari attack case one day police custody for six accused
Amol Mitkari: "चंद्रकातदादा पालकमंत्री असताना ड्रग्जच्या घटना व्यवस्थित सुरु होत्या"; मिटकरींचा खळबळजनक आरोप

गुन्हयातील फरार आरोपींचे शोधकामी स्था.गु.शा. अकोला आणि पोलीस स्टेशन सिव्हील लाईन, अकोला यांचे पथके रवाना करण्यात आली होती. सदर गुन्हयामध्ये ३१ जुलै रोजी गुन्हयातील पंकज साबळे, सौरभ भगत, दिपक बोडखे यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली होती. तर १ ऑगस्ट रोजी प्राप्त गोपनिय माहितीचे आधारावर आर. जी. हॉटेल येथे सापळा रचून गुन्हयातील आरोपी अरविंद शुक्ला, मंगेश धोडफळे, सचिन

9 accused arrested in Amol Mitkari attack case one day police custody for six accused
Amol Mitkari: अमोल मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मनसैनिकाचा मृत्यू; घटनेनंतर नेमकं काय घडलं होतं?

गालट, ललीत यावलकर, रूपेश तायडे आणि शिवप्रताप मेघाडे यांना कायदेशीर अटक करण्यात आली. नंतर अटक करण्यात आलेल्या आरोपीतांचा २ ऑगस्ट पर्यंत न्यायलयाने पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केला आहे. आरोपींना विचारपुस करून सदर गुन्हयात सहभागी असलेले त्यांचे इतर सहका-यांचा शोध घेण्यात येत असुन त्यानुसार त्यांचे शोध कामी पथके तयार करून रवाना करण्यात आली आहेत. गुन्हयाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे करत असुन तपासामध्ये प्राप्त होणा-या पुराव्यानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.