Gopal Datkar : शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दातकर यांच्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल

हिंगणी बु. येथील महिला सरपंचाने त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
Gopal Datkar
Gopal Datkaresakal
Updated on

अकोला : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्यावर अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला. हिंगणी बु. येथील महिला सरपंचाने त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Gopal Datkar
Manoj Jarange News: जरांगेंनी दिलेला अल्टिमेटम संपला, सरकार काय निर्णय घेणार?

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील हिंगणी बु. येथील ग्राम पंचायतच्या महिला सरपंचांना गोपाल दातकर यांनी ग्राम पंचायतमधून नमुना आठची मागणी केली होती. तो न दिल्याने त्यांनी तक्रारकर्त्या महिला सरपंच यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या आवारात कर्मचाऱ्यांसमोर ही घटना घडली होती. प्राप्त तक्रारीवरून शहरातील सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये अॅट्रासिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

हिंगणी बु. ग्रा.प.अंतर्गत ओबीसीचे घरकुल मंजुरीसाठीच्या लाभार्थ्यांनी नमुना आठ ‘अ’ची ग्रामसभेत मागणी केली होती. मात्र नमुना ८ न मिळाल्याने ही बाब गट विकास अधिकाऱ्यांना सांगीतली. दोन वेळा पत्रही देणे. मात्र नमुना ८ न मिळाल्याने सीईओंकडे धाव घेतली. मात्र सीईओ नव्हत्या. याठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बांगर, गट विकास अधिकारी रुद्रकार, सह. गटविकास अधिकारी परिहार हेही होते. सरपंचही तेथे आल्या. त्यांनी नमुना ८ देण्यास नकार दिला. सरपंच यांना भाजपचे सहकार्य असून, दबावात येऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मी जातीवाचक शिविगाळ केली नसून, माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- गोपाल दातकर, जिल्हाप्रमुख शिवसेना तथा जि.प. गटनेते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.