Akola News : मधुमेह हा रोग अलीकडे १०-१५ वर्षांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढला आहे. बहुतांश कुटुंबात मधुमेहाचे रुग्ण दिसून येतात. याचे कारण म्हणजे बदलती जीवनशैली, बैठे काम जास्त प्रमाणात होत असल्याने शरीराला व्यायाम मिळत नाही.
मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या डोळ्यांवर घातक परिणाम होतात. मधुमेह असणाऱ्या सुमारे ८० टक्के रुग्णांमध्ये ‘रेटिनापॅथी’ हा आजार उद्भवत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मधुमेहामध्ये आपल्या रक्तातील साखर वाढते. त्यामुळे शरीरातील सर्व अवयवांवर त्याचा परिणाम होतो.
मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये जर रक्तातील साखर नियंत्रणात नसेल तर डोळ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. डायबेटिक रेटिनोपॅथी ही यातील एक महत्त्वाची समस्या आहे. डोळ्यातील आंतरपटलाला हा एक अतिशय नाजूक भाग आहे.
या आंतरपटलावर पडणारी किरणे डोळ्यांच्या नसांमार्फत मेंदूला पोचवली जातात व त्यामुळेच आपल्याला दिसू शकते. या आंतरपटलातील सर्वांत संवेदनशील भाग म्यॅकुला असतो. या आंतरपटलामध्ये रक्तवाहिन्यांची एक विशिष्ट रचना असते.
दीर्घकाळ डायबेटिस असल्यामुळे आणि मधुमेहावर नियंत्रण नसल्यामुळे या आंतरपटलाच्या रक्तवाहिन्यांमधून रक्त पाझरते किंवा काहीवेळा कमकुवत रक्तवाहिन्यांचे वेडेवाकडे जाळे पसरते, या व्याधींना एकत्रितपणे डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतात.
मधुमेह अनियंतत्रित असल्यास हा आजार होण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे जे लोक दीर्घ कालावधीपासून मधुमेही आहेत व ज्यांच्यामध्ये साखरेचे प्रमाण अनियंत्रित आहे त्यांना रेटिनोपॅथी होण्याची शक्यता जास्त असते.
डायबेटिक रेटिनोपॅथी हा आजार गंभीररित्या घेण्याची गरज आहे. दुर्लक्ष केल्यास डोळ्यांची दृष्टी जाण्याची शक्यता असते. यासाठी नेत्ररोग तज्ञांची मदत घेणे. दर सहा महिन्यातून एकदा संपूर्ण डायबेटिक तपासणी करवून घेणे आणि डायबेटिक तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे रक्तातील साखरेचे प्रमाण घरी तपासले गेले पाहिजे.
मधुमेहींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
मधुमेहासाठी आनुवंशिकता
आहारात कॅलरीजचे वाढलेले प्रमाण
बैठी जीवनशैली ही प्रमुख कारणे सांगितली जातात.
दृष्टी कमी होण्यापासून रोखण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे मधुमेहाचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करावे. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचे प्रमाण वाढते आहे. मधुमेहाचे डोळ्यांवर घातक परिणाम होतात. मधुमेह असेल तर डोळे तपासून घेतले पाहिजेत. ज्या रुग्णांना तीव्र मधुमेह असतो त्यांना डायबेटिक रेटिनोपॅथीचा त्रास उद्भवतो.
- डॉ. श्रीराम लाहोळे, नेत्ररोग तज्ञ, अकोला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.