अकोला - स्वतःच्या दहा वर्षाच्या मुलीवर वडिलांकडून दोन वर्षापासून अत्याचार केला जात असल्याची घटना उघड झाल्याने एकच खळबळ उडाली. अकोट फैल पोलिस स्टेशनअंतर्गत ही घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्यास अटक केली आहे.
अकोट फैल येथील दहा वर्षाच्या मुलीने पोलिस स्टेशनला तक्रार दिली की, तीचे वडील २०२२ पासून तिच्यावर अत्याचार करीत आहेत. याबाबत कुणाला काही सांगितले तर जीवानिशी ठार मारेल अशाप्रकारची धमकी तिला मिळत होती. यामुळे तीने कुठेही वाच्यता केली नाही. त्यामुळे तिच्यावरील अत्याचार वाढत गेला.