Sindkhed Raja : दिव्यांग महिला आणि युवा अधिकारी कर्मचारी सांभाळणार आदर्श मतदान केंद्र - प्रा.संजय खडसे

सिंदखेड राजा मतदार संघामध्ये दिव्यांग,महिला तसेच युवा अधिकारी कर्मचारी आदर्श मतदान केंद्र सांभाळणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक सहाय्यक निर्णय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी दैनिक सकाळ सोबत बोलताना सांगितले आहे.
sanjay khadse
sanjay khadseSakal
Updated on

सिंदखेड राजा : सिंदखेड राजा मतदार संघामध्ये दिव्यांग,महिला तसेच युवा अधिकारी कर्मचारी आदर्श मतदान केंद्र सांभाळणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक सहाय्यक निर्णय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी दैनिक सकाळ सोबत बोलताना सांगितले आहे.शहरी भागामध्ये ५ मतदान केंद्र तर ग्रामीण भागांत ३ केंद्र असणार आहे.

मतदार संघामध्ये एकूण ३३६ मतदान केंद्र आहे,त्यामध्ये शहरी भागामध्ये ३७ तर ग्रामीण भागांत २९९ आहेत.लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिव्यांग महिला तसेच युवा अधिकारी कर्मचारी यांना सुद्धा या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष भाग घेता येणार आहे.मतदार संघामध्ये २ सखी मतदान केंद्र असणार आहे.

यामध्ये पंचायत समिती बांधकाम विभाग सिंदखेड राजा, नगरपरिषद श्री शिवाजी हायस्कूल खोली क्रमांक १ मध्ये असणार आहे. या सखी मतदान केंद्रावर अधिकारी कर्मचारी म्हणून महिला असणार आहे.नगर परिषद टाऊन हॉल सिंदखेड राजा या मतदान केंद्रावर सर्व कर्मचारी हे दिव्यांग असणार आहे.शहरी भागांमध्ये २ युवक मतदान केंद्र तर ग्रामीण भागांत ३ मतदार केंद्र असणार आहे.

त्यामध्ये सिंदखेड राजा येथील नगर परिषद प्राथमिक मराठी मुलींची शाळा दक्षिण खोली क्रमांक २ असणार आहे. देऊळगांव राजा येथील नगरपरिषद श्री शिवाजी हायस्कूल खोली क्रमांक ३ शहरी गांवामध्ये असणार आहे.

तर जिल्हा परिषद मराठी प्राथमिक मुलींची शाळा खोली क्रमांक १ देऊळगाव मही,जिल्हा परिषद मराठी केंद्रीय प्राथमिक शाळा पूर्वेस क्रमांक १ दुसरबीड, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा खोली क्रमांक २ सिनगांव जहागीर या ग्रामीण भागातील ३ मतदान केंद्रावर युवा अधिकारी व कर्मचारी राहणार आहे.

विद्युत सुविधा,पिण्याचे पाणी, स्त्री पुरुषांसाठी स्वातंत्र्य प्रसाधनगृहे आदी सुविधा उपलब्ध असणार आहे.तसेच दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर, रॅम्प आदींच्या सुविधा उपलब्ध असणार आहे. उष्णघातापासून त्रास होवू नये साठी आवश्यक प्रथमोपचार औषधे तसेच ओआरएस पावडर प्रशासनाकडुन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यावेळी सिंदखेड राजा तहसीलदार सचिन जैस्वाल, देऊळगांव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळे,नायब तहसीलदार डॉ.आस्मा मुजावर, मनोज सातव, निवडणूक कर्मचारी भगवान मुसळे,गजानन राऊत,प्रशांत वाघ, एस.पी. तुरुकमाने,एम.ए.रत्नपारखे, एस.आर.पवार, सचिन मिसाळ,गणेश देशमुख आदीजण उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.