माहित आहे का? मागील वर्षीच्या दमदार पावसाचा असाही झाला परिणाम...वाचा

khadkpurna project in buldana district.jpg
khadkpurna project in buldana district.jpg
Updated on

अकोला : मागील वर्षी राज्यात सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कधी नव्हे तसे चित्र शेतकऱ्यांना पहावयास मिळाले. परंतु या पावसामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईला तारल्याचे दिसून आले. पूर्ण उन्हाळा संपल्यानंतरही गेल्यावर्षी यावेळेस राज्यातील प्रकल्पांत केवळ 7.65 टक्के जलसाठा उपलब्ध होता. तोच यंदा 24.34 टक्के उपलब्ध असल्याने नागरिकांची पाण्यासाठी ससेहोलपट झाली नाही.

राज्यात रखरखते ऊन आणि पाणीटंचाई हे दोन विषय नित्याचेच. मात्र, मागील वर्षी मॉन्सूनने लावलेली दमदार हजेरी शेतकऱ्यांना दिलासादायक ठरली आहे. अति पावसामुळे खरिपात जरी शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले तरी रब्बीत याच पाण्याचा चांगला फायदा झाला आहे. या पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहले तसेच शेततळे, तलाव व विहिरी तुडूंब भरल्या होत्या. 

त्याचाच परिणाम पिकांवर दिसून आला. गेल्या वर्षी अत्यल्प पावसामुळे राज्यातील अनेक धरणांसह तलाव, विहिरींतील पाणीसाठाही तळाला गेला होते. परंतु यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चटके कमी प्रमाणात दिसून आले. गेल्यावर्षी दुष्काळजन्य परिस्थितीत याच वेळेला राज्यातील सर्व धरणांमध्ये 7.65 टक्के जलसाठा उपलब्ध होता. 

बहुतांश प्रकल्प हे कोरडीठाक पडली होती. मात्र, यावर्षी 24.34 टक्के जलसाठी उपलब्ध आहे. परिणामी, नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागल्याचे चित्र कमी प्रमाणात दिसून आले. तसेच पाणी कपातीचे संकटही ओढावले नाही.

विभागनिहाय प्रकल्पांतील पाणीसाठा (2019 व 2020 टक्केवारीत)
विभाग        2019     2020
अमरावती     7.51     20.17
औरंगाबाद     0.7       23.18
कोकण        26.83    35.97
नागपूर         6.24     37.77
नाशिक        6.56     24.18
पुणे             7.49     19.37
एकूण          7.65     24.34

यावर्षीही चांगल्या पावसाचे संकेत
गेल्यावर्षी सतत दमदार पाऊस सुरू असल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा कमी जाणवल्या. त्याचप्रमाणे यंदाही पावसाळ्यात चांगल्या पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहे. पूर्वमॉन्सूनच्या सरी राज्यातील बहुतांश भागात बरसल्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.