पेरणी सुरू अन् तुरीला सात हजारावर भाव!

उत्पादन हाती आल्यानंतर किमान आधारभूत किमतही मिळणे कठीण
agriculture news market committee price of Tur Rs 7000 per quintal akola
agriculture news market committee price of Tur Rs 7000 per quintal akolasakal
Updated on

अकोला : जवळपास जुलैच्या सुरुवातीपासून खरीप पेरणीला वेग आला अन् बाजार समितींमध्ये तुरीचे भाव वधारायला सुरुवात झाली. आतातर एमएसपीपेक्षाही (६६०० रु.) अधिक म्हणजे प्रतिक्विंटल ७ हजार रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत आहे. विशेष म्हणजे हंगामातील उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती पीक येताच, भाव घसरण सुरू होते व वर्षभर शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमत सुद्धा मिळणे कठीण होते. गेल्यावर्षीपर्यंत ‘शेतकऱ्यांच्या हातावर तूर’, असे उपहासात्मक वाक्यच बाजार समितीतील तुरीला मिळणाऱ्या दरामुळे प्रख्यात झाले होते. शासनाच्या हमीभाव केंद्रांवरही निम्म्याहून कमी तूर उत्पादनाची खरेदी होत असल्याने जिल्ह्यातील तूर उत्पादकाच्या पदरात निराशाच पडायची.

मात्र, गेल्या हंगामातील तुरीला बाजार समित्यांमध्ये जवळपास सहा ते साडेसहा हजार रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आणि या वर्षी देखील चांगला भाव मिळेल या अपेक्षेणे शेतकऱ्यांनी जोरदार पेरणी केली. केंद्र सरकारने सुद्धा खरीप २०२२-२३ करीता किमान आधारभूत किमत निर्धारित करताना तुरीला ३०० रुपयांनी वाढ देत प्रतिक्विंटल ६६०० रुपये हमीभाव दिला. परंतु, शेतकऱ्यांना हा हमीभाव बाजार समित्यांमध्ये मिळेल यांची कोणतीही शाश्‍वती नाही. सध्या खरीप पेरणी सुरू असून, अंतिम टप्प्यात आहे. सध्या मात्र, बाजार समितीमध्ये तुरीला हमीभावापेक्षाही अधिक म्हणजे प्रतिक्‍विंटल सात हजार रुपयांहून अधिक भाव मिळत आहे.

हंगामतील तूर शेतकऱ्यांच्या हाती आल्यानंतरही या प्रमाणे शेतकऱ्यांना भाव मिळावा, अशी अपेक्षा आहे. मात्र, पेरणीवेळी विक्रीला असणारी तूर ही व्यापाऱ्यांची व हंगाम अखेरिस विक्रीसाठी येणारी तूर शेतकऱ्यांची, असा फरक असल्याने बाजार समित्यांमध्ये भावातही बदल होत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पेरणीही जोरदार

दरवर्षी जिल्ह्यात तुरीचे क्षेत्र वाढत असून, सोयाबीन व कपाशीनंतर सर्वाधिक पेरा तुरीचा होतो. यावर्षी देखील कृषी विभागाद्वारे जिल्ह्यात ५५ हजार ५२५ हेक्टरवर तुरीच्या पेरणीचे नियोजन आखले होते व १५ जुलैपर्यंत त्याहूनही अधिक क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.