Akola Child Sudden Death: तुरीचे दाने चिमुकल्याच्या जीवावर बेतले! तुरीचा दाना नाकात गेल्याने ३ वर्षीय बालकाचा मृत्यू

तुरीचा दाना नाकात अडकल्याने एका तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना दहीहंडा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाटसुल या गावात ता. २३ जानेवारी रोजी रात्री घडली.
Akola Child Sudden Death: तुरीचे दाने चिमुकल्याच्या जीवावर बेतले! तुरीचा दाना नाकात गेल्याने ३ वर्षीय बालकाचा मृत्यू
Updated on

3 Year Old Child Died: अकोल्यातील पाटसुल या गावात धक्कादायक घटना घडली. एका छोट्या चुकीमुळे ३ वर्षीय बालकाला जीव गमवावा लागला. दहीहंडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पाटसुल गावातील ईसापुरे कुटुंबातील चिमुकल्याच्या नाकात तुरीचा दाना गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.


ता. २३ जानेवारी रोजी घरात आजी तुरीचे दाने काढत असताना नातू योगिराज अमोल ईसापुरे हा आजीजवळ आला. आजीने काढून ठेवलेल्या तुरीचे दाने त्या चिमुकल्याने मुठीत घेतले आणि तोंडात ओतले. त्यातील एक दाना मुलाच्या नाकात गेला. त्याला लगेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ते पाहून कुटुंबीय त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी निघाले; परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

Akola Child Sudden Death: तुरीचे दाने चिमुकल्याच्या जीवावर बेतले! तुरीचा दाना नाकात गेल्याने ३ वर्षीय बालकाचा मृत्यू
Weather Update: कडाक्याच्या थंडीसोबत आता अवकाळी पावसाचीही शक्यता! वाचा हवामान विभागाचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.