- श्रीकांत राऊतअकोला : जिल्ह्यात कॉलरा, अतिसार, कावीळ, टायफॉइड या सारख्या साथीच्या रोगांचे रुग्ण आढळत आहेत. साथीच्या रोगांना आवर घालण्यासाठी शुद्ध व पिण्यायोग्य पाणी वापरात असले पाहिजे. .जिल्ह्यात मागिल महिन्यात केलेल्या पाहणीत वेगवेगळ्या ठिकाणांहून १८१२ पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासले असता १६९ पाण्याचे नमुने दूषित असल्याचे आढळून आले. त्यापैकी २४ नमुने शहरी भागातील आहेत. आरोग्य विभागाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली असली तरी नागरिकांनी स्वत:हून खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.पावसाळ्यात हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले असते. थंडीचे प्रमाण सतत कमी-जास्त होत असते. त्याचा परिणाम आपल्या शरीरात चालणाऱ्या क्रियांवर होतो. आपली पचनशक्ती तसेच रोगप्रतिकारशक्ती मंदावते. .पावसाळ्यात अशुद्ध पाण्याचे प्रमाण तसेच दूषित अन्नाचे प्रमाण वाढलेले असते. दूषित पाणीपुरवठ्यामुळे मोठ्या प्रमाणात आजारांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. विहीर, बोअर, पंप यासह इतर जलस्रोतांमधून दूषित पाणीपुरवठा होतो. दूषित पाणी पिल्याने गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ, टायफॉइड अशा आजारांना निमंत्रण मिळते. दूषित पाणीपुरवठ्याचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे..मागील महिन्यात जिल्ह्यातील ८५० गावांमधून १ हजार ८१२ नमुने तपासण्यात आले. त्यापैकी १६९ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाणी शुद्ध करून पिण्यासाठी वापरावे. दूषित पाणी पिल्याने काही लक्षणे जाणवत असल्यास ताडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा खासगी डॉक्टरांकडे उपचार घेणे गरजेचे आहे.ग्रामपंचायतींना कीटचे वाटपपाणी नमुने तपासणीसाठी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला आता कीट देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ते आपल्या स्तरावरही पाणी नमुना तपासणी करू शकतात..उपाययोजना कोणत्या ?पाणी उकळून व गाळून घ्यावे, पिवळ्या रंगाचे दूषित पाणी असेल तर त्यात तुरटीचा वापर करावा, अधिक दिवस साठवलेले किंवा उघड्यावरचे पाणी पिणे टाळावे. ग्रामीण भागात पाण्याविषयी फारशी जागरूकता नसल्याने जलजन्य आजारांचे प्रमाण येथे अधिक असते. त्यासाठी खेड्यापाड्यात जनजागृती करणे गरजेचे आहे.आरोग्य विभागाकडून कारवाईज्या आरोग्य केंद्र परिसरातील पाणी नमुने दूषित आढळतात त्यांना तातडीने पत्र दिले जाते. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून संबंधितांना पत्र दिले जाते. जलस्रोतापासून १० ते १५ मीटर परिसर स्वच्छ ठेवला जातो, तसेच नळगळती बंद केली जाते. पावसाळ्यात नियमित सार्वजनिक जलस्रोतांची तपासणी केली जाते..आकडे बोलतातजिल्ह्यातील तपासलेले नमुने - १८१२तपासणी केलेल्या गावांची संख्या - ८५०ग्रामीण भागातील दूषित नमुने - १४५शहरी भागातील दूषित नमुने - २४दूषित पाण्याची टक्केवारी - १०.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.