बोर्डी : अकोट तालुक्यातील बोर्डी, धारुळ रामापूर, कासोद शिवपूर, राहणापूर, अकोलखेड, आंबोडा, उमरा, बेलुरा, पिंपरी, अशा अनेक गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे कपाशी, सोयाबीन, संत्रासह इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नुकसानग्रस्थ गावांना आ.प्रकाश भारसाखडे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी भेट दिली.
यावेळी तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील पाचडे, संजय आठवले, तहसीलदार नीलेश मडके, कृषी मडळ अधिकारी भारसाखडे, महसुल मंडळ अधिकारी नेमाडे, कृषी सहायक बैरागी, तलाठी खामकर, ग्रामसेवक मोहोकार, उपसरपंच राजेश भालतिलक, शेतकरी नेते प्रभाकर मानकर, राधेश्याम यावलकर, राजेश रावनकर, उमेश पवार, ग्रा.पं.सदस्य मनोहार आतकड, राजेश मावलकर, समाधान चंदन, रमेश गये उपस्थित होते.
ऐन सणासुदीच्या काळात व भरभरून पीक उभे असलेल्या शेतकऱ्याच्या आनंदात खूप मोठे विरजण पडलेले आहे. गत अनेक दिवसांपासून सततच्या मुसळधार पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे, तसेच काही गावांमध्ये कधीच पाऊस पडला असून, जिल्ह्यातील अनेक नेते-मंडळी अकोट तालुक्यातील अतिवृष्टी भागाची पाहणी करीत आहेत. शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भावना त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचा प्रयत्न तालुक्यातील अनेकांकडून केल्या जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.