अकोला : जिल्ह्यातील विविध मार्गांवरील अपघातप्रवण स्थळे निश्चित करुन त्यावर मार्गदर्शक सुचनांचे व जागृती करणारे फलक लावावे जेणेकरुन अपघातांची शक्यता कमी करता येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी बाळापूर डॉ. रामेश्वर पुरी, उपविभागीय अधिकारी अकोट श्रीकांत देशपांडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, महापालिकेचे अजय शर्मा, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अक्षय पांडे, तसेच वाहतूक पोलिस व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ऑटोरिक्षाच्या प्रमाणावर नियंत्रण आणा
ऑटो रिक्षांवर शहरी व ग्रामीण भागासाठी हिरवे व लाल रंगाचे स्टिकर्स लावण्याची मोहीम लवकरात लवकर पूर्ण करुन शहरात येणाऱ्या ऑटोरिक्षांच्या प्रमाणावर नियंत्रण आणावे. यासंदर्भात 8 जुलै रोजी होणाऱ्या पुढील बैठकीत अहवाल सादर करावा, असेही बैठकीत जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. रस्ते सुरक्षा प्रतिज्ञेचे विमोचनह जिल्हाधिकारी अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले.
रस्त्यांवर वेगमर्यादा फलक लावा!
शहरातील विविध चौकात सिग्नल लावण्यात आले आहेत, तथापि, अतिक्रमणे व होर्डिंग्ज यामुळे सिग्नल दृष्टीपथात येणे व थांबण्यासाठी पुरेशी जागा नसणे ही समस्या येत आहे. यासमस्येवर उपाय म्हणून प्रत्येक सिग्नल चौक हे मोकळे करावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. रस्त्यांवर वेगमर्यादा पालन होण्यासाठी आवश्यकतेनुसार रस्त्यांवर खुणा कराव्या. वेगमर्यादा फलक लावावे. अशी ठिकाणे निश्चित करुन आवश्यक कारवाई पूर्ण करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी अरोरा यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.