अकोला - अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणारे प्रहारचे उमेदवार अशोक मधुकर ओळंबे, हरिश आलिमचंदाणी आणि राजेश कृपाशंकर मिश्रा यांच्याकडून प्रचारार्थ जाहिरातीमध्ये भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ दिवगंत नेते माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांच्या छायाचित्राचा वापर केला जात आहे. भाजप पुरूस्कृत उमेदवार असल्याचे भासवुन नियमबाहय कृत्य करीत असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी तक्रार कृष्णा शर्मा यांनी निवडणूक विभागाकडे केली आहे.