सेल्फी ले ले रे!, मुख्यंमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिकवले राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना  सेल्फी कशी काढतात?

Akola Buldana News Lonar Sarovar Chief Minister Uddhav Thackeray Rajendra Shingane Selfie Mobile Photo
Akola Buldana News Lonar Sarovar Chief Minister Uddhav Thackeray Rajendra Shingane Selfie Mobile Photo
Updated on

बुलडाणा : मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे यांनी आज सकाळी बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिध्द लोणार सरोवराची पाहणी केली. सकाळच्या प्रसन्न वातावणार लोणार सरोवराचं विलोभणीय दृष्य पाहून सहाजिक मुख्यमंत्र्यांमधील फोटोग्राफर (छायाचित्रकार) जागा झाला. 

फोटोग्राफी मुख्यमंत्र्यांचा आवडता छंद. त्यासाठी ते राजकारण सारूणही वेळ काढतात. मात्र, लोणार सरोवराची फोटो काढण्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांच्या सोबत असलेले राष्ट्रवादीचे नेते तथा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री असलेले राजेंद्र शिंगणे यांना मोबाईलने सेल्फी काढायला शिकवले. औषध प्रशासन मंत्री असलेले शिंगणे यांना मुख्यमंत्र्यांनी सेल्फी काढायला शिकवला.

मुख्यमंत्र्यांनी घेतला सेल्फीचा क्लास
जगप्रसिध्द लोणार सरोवराची पाहणी केल्यानंतर तथा अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर औपचारिक फोटोसेशन करतावेळी मंत्री राजेंद्र शिंगणे सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना ती घेता येत नव्हती. राजेंद्र शिंगणे यांना सेल्फी घेण्यास अडचण येतीय हे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा सेल्फी क्लास घेतला. शिंगणेंच्या हाताला हात लावून, मोबाईल जरासा उंचीवर पकडून त्यांनी एक छानसा सेल्फी घेतला. सेल्फीनंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्री शिंगणेकडे पाहत छानसं स्मितहास्य केलं.

लोणार  जैवविविधतेचे भांडार

लोणार सरोवर हे जैवविविधतेचे भांडार आहे. या सरोवराचा विकास करताना एक निश्चित नियोजन तयार करावे. त्यानुसार आराखडा तयार करावा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तरच हे सरोवर पर्यटनासाठी नावारूपास येईल, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. लोणार सरोवर येथील वनकुटी व्ह्यू पॉईंटला  त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी लोणार सरोवराविषयी माहिती जाणून घेतली.

(संपादन - विवेक मेतकर)

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.