Akola : कोळी समाजाची जात लिहिलेले प्रमाणपत्र एसडीओंकडून मिळावे

माजी आमदार चैनसुख संचेती यांची मागणी; सर्व विभागात नोंदविल्या तक्रारी
MLA Chainsukh Sancheti'
MLA Chainsukh Sancheti'esakal
Updated on

अकोला : शासन निर्णयातील विशेष मागास प्रवर्ग (एस.बी.सी.)मधील मच्छीमार कोळी, असीर कोली, खानदेश कोली, पान कोळी, खिश्चन कोळी, चुंबळे कोळी, पानभरे कोली, कोली सूर्यवंशी, मांगेला सोनकोळी, वैती, खारवा किंवा खारवी यांना त्यांची जात लिहिलेले जातीचे दाखले उपविभागीय कार्यालय (एसडीओ) यांचेकडून देण्यात यावे, अशी मागणी भाजप नेते व माजी आमदार चैनसुख संचेती यांनी शासनाकडे केली आहे.

MLA Chainsukh Sancheti'
Akola : भोंदू तांत्रिक बाबाविरुद्ध गुन्हा दाखल

शासन निर्णयानुसार विशेष मागास प्रवर्गमधील अ.क्र.चारवर मच्छीमार कोळी, अहीर कोळी, खानदेश कोळी, पान कोळी, खिश्चन कोळी, चुंबले कोळी, पानभरे कोळी, कोळी सूर्यवंशी, मांगेला सोनकोली, वैती, खारवा किंवा खारवी जातीचा विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) मध्ये समावेश करण्यात आला आहे. परंतु, उपविभागीय अधिकारी त्यांना त्यांची जात लिहिलेले जातीचे दाखले देत नाही.

MLA Chainsukh Sancheti'
Akola : अकोल्यात युवा साहित्यिकांची मांदियाळी

वरील सर्व जातींना कोळी, तत्सम जाती लिहिलेले जातीचे प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी नियमबाह्य पद्धतीने निर्गमीत करतात. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयसुद्धा उमेदवारांच्या खाऱ्या जातीची पडताळणी करीत नाही. त्यांना कोळी, तत्सम जातीची नियमबाह्य पध्दतीने कोळी, तत्सम जातीची वैधता प्रमाणपत्र देतात. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयामध्येसुध्दा वरील जातींची सांस्कृतिक, चालीरीती, पोशाख, भौगोलिक प्रदेश, नृत्य इत्यादीची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

MLA Chainsukh Sancheti'
Akola : केशवनगरचा कारखाना सुरू होणार!

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयामधील संशोधन अधिकारी यांनी सुध्दावरील जातीचे काहीही संशोधन केलेले नाही, असे संचेती यांना प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, सर्व जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय यांच्याकडे याबाबत तक्रारी दाखल करण्यात आल्या असल्याचे संचेती यांनी सांगितले.

MLA Chainsukh Sancheti'
Akola : कपाशीवर लाल्या; शेतकरी चिंतेत!

राज्यभरात कोळीच्या या जातीचा उल्लेखच नाही

कोकण आणि डेक्कनमध्ये कोळी जातीचे आगरी कोळी, बंड कोळी, भिलावे कोळी, चांची कोळी, हेलमार कोळी, कल्बेर कोळी, कराडे कोळी, खार कोळी, कोकण कोळी, कुलपर्ना कोळी, मराठा कोळी, मारवी कोळी, मेंडाळे कोळी, मेटा किंवा धनगर कोळी, मुसळे किंवा मांडू कोळी, नेहरे कोळी, राहतडकर कोळी, शिंगटोकी कोळी, सोलेसी काष्टी किंवा लल्लनगोटी कोळी, टांकी कोळी, तायडे कोळी, ठांकर कोळी, वाली कोळी, हे प्रकार आहेत.

MLA Chainsukh Sancheti'
Akola : दारू वाहतूक करणाऱ्या टोळ्यांचा शहरात हैदोस

त्यांनासुध्दा त्यांची जात लिहीलेले जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाहीत. उपविभागीय अधिकारी त्यांनासुध्दा कोळी व तत्समजाती लिहिलेले जातीचे प्रमाणपत्र वितरीत करतात व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयसुध्दा सदर उमेदवाराची जातीची पडताळणी न करता कोळी व तत्सम जातीची वैधता प्रमाणपत्र वितरीत करतात, असे संचेती यांना पत्रात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()