Zero Shadow Day : सावली सोडणार साथ; अकोलेकर घेणार शून्य सावलीचा अनुभव

असे म्हणतात स्वतःची सावली कधीच साथ सोडत आहे. सदैव साथ देणारी ही सावली काही क्षणांसाठी अकोलेकरांची साथ सोडणार आहे.
Zero Shadow Day
Zero Shadow Daysakal
Updated on
Summary

असे म्हणतात स्वतःची सावली कधीच साथ सोडत आहे. सदैव साथ देणारी ही सावली काही क्षणांसाठी अकोलेकरांची साथ सोडणार आहे.

अकोला - असे म्हणतात स्वतःची सावली कधीच साथ सोडत आहे. सदैव साथ देणारी ही सावली मंगळवार, ता.२३ मे रोजी मंगळवारी दुपारी १२ वा. १८ मिनिटांनी मात्र, काही क्षणांसाठी अकोलेकरांची साथ सोडणार आहे. सावली हरविल्याचा अनुभव व या नैसर्गिक तथा भौगोलिक घटनेचे साक्षीदार होण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले आहे.

दररोज पूर्व क्षितिजावर उगवणारा सूर्य पृथ्वीच्या कर्कवृत्त ते मकरवृत्त हा प्रवास पूर्ण करतांना सूर्य क्रांती ज्या दिवशी ज्या पट्ट्यातील अक्षवृत्तावर समान असते त्या ठिकाणी सूर्य किरणे सरळ पडतात. त्यामुळे आपलीच सावली आपल्याच पायाशी काही क्षण दिसेनाशी होते. ही महत्त्वपूर्ण खगोलीय घटना प्रतिवर्षी दोनदा विषुववृत्तापासून साडे तेविस अक्षांश उत्तर -दक्षिण होत असते.

उन्हाळ्यात घडणाऱ्या या घटनेला अधिक महत्त्व असून, पावसाळ्यातील घटना गौण मानल्या जाते. आपल्या देशात रांची, भोपाळ, झाशीच्या उत्तरेकडील भागात हा अनोखा अनुभव घेता येत नाही. आपल्या जिल्ह्यात या अनोख्या खगोलीय घटनेचा आरंभ दक्षिण भागाकडून उत्तर बाजूस पुढे सरकत जाईल. ता. २२ मे रोजी पातूर, महान, पिंजर या भागातून होईल.

दूसऱ्या दिवशी ता.२३ रोजी अकोला, बाळापूर, मूर्तिजापूर, कूरूम या परिसरात ता. २४ रोजी दहिहांडा, चोहोट्टा, अंदूरा, हाता या पूर्णा नदीच्या पट्ट्यात व ता. २५ मे रोजी तेल्हारा, अडगाव, अकोट ,सावरा या भागातील लोकांना दूपारी स्थान परत्वे दुपारी १२ वा.१६ ते १२ वा. १९ मिनिटांनी पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकताना अवश्य घेता येईल.

असा घेता येईल अनुभव

इच्छूक भूगोल, खगोल प्रेमींनी काही दंडगोलाकार पाईप, अधिक उंच पावडर डबे, स्टंप, जाड काठी आदी साहित्य वापरून प्रयोगाचे आधी सावली नोंदवून घ्यावी. या चार दिवसांत सूर्याचा आकाश प्रवास आपल्या जिल्ह्यातील सर्व ठिकाणाहून होणार असल्याने ठळक गाव वा शहरातील आवड असणाऱ्या लोकांनी चढत्या उन्हाची आवश्यक ती काळजी घेऊनच या अनोख्या घटनेचा आनंद घ्यावा.

देवरीचे खगोलीय महत्त्व

पृथ्वीवरील पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या आणि उत्तर -दक्षिण असणाऱ्या या काल्पनिक रेषांच्या विश्वात आपणही काही कालावधी रमायला हवे. आपल्या जिल्ह्यातील या संदर्भात भौगोलिक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे अकोला-अकोट या प्रमुख मार्गावरील देवरी गावाच्या पश्चिमेस एक किलोमीटर अंतरावर २१ अंश पूर्णांकी अक्षवृत्त आणि ७७ अंश पूर्णांकी रेखावृत्त एकमेकांना छेदल्या जातात. असे हे महत्त्वाचे स्थान समजून आपण त्याची ओळख जाणायला हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.