अकोला : आगामी मनपा निवडणुकीच्या (Municipal elections) अनुषंगाने शहरात संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने शहर काँग्रेसने (Congress) आपली जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यामध्ये सुमारे १४७ पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्वच नियुक्तीमुळे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
काँग्रेसचे नवनिर्वाचित महानगरध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे यांनी पदभार स्वीकारताच शहर काँग्रेस कमिटीच्या सर्व ज्येष्ठ पदाधिकारी व मार्गदर्शक यांना सोबत घेत शहरात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याच दृष्टीकोनातून काँग्रेसने सुमारे १४७ पदाधिकारी यांची विविध पदांवर नियुक्ती केल्याचे पत्र जाहीर केले आहे. सदर पदाधिकारी यांची ही नियुक्ती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने काँग्रेसचे संघटन व प्रशासन विभागाचे प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी याबाबत अधिकृत नियुक्ती पत्र जाहीर केले आहे. या नियुक्तीमुळे शहर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
युवा चेहऱ्यांना संधी!
शहर काँग्रेस कमिटीच्या जाहीर केलेल्या या कार्यकारिणीत मोठ्या प्रमाणात युवा व फ्रेश चेहऱ्यांना संधी देण्यात आली असल्याचे दिसून येते. या जाहीर झालेल्या कार्यकारिणीने निश्चितच काँग्रेसचे शहरातील संघटन मोठ्या प्रमाणात मजबूत होणार असून मनपा निवडणुकीत काँग्रेस मोठ्या प्रमाणात यश प्राप्त करणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.