Akola Incident : कुटुंबातील एकमेव कमावणारा होता, अकोल्याच्या घटनेत जीव गमावला, कुटुंब झालं निराधार...

कुटुंबातील एकमेव कमावता असलेला विलास, अकोल्यातील भगतसिंग नगर येथे पत्नी आणि तीन मुलांसह 10×10 चौरस फूट खोलीत राहायचा
Akola Clashes
Akola Clashesesakal
Updated on

Akola Clashes : 13 मे रोजी अकोल्यात दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक हाणामारीत 39 वर्षीय विलास गायकवाड यांच्या कुटुंबीयांना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमानपत्रात दिसल्यानंतरच समजली.

कुटुंबातील एकमेव कमावणारा विलास. इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारा विलास शनिवारी रात्री कामावरून घरी परतत होता. त्याचवेळी सोशल मीडिया पोस्टवरून दोन समुदायांमध्ये चाललेल्या हाणामारीच्या वेळी त्याला दगड आणि पाईपने मारण्यात आले.

वृत्तापत्रातून मिळाला निरोप

विलासचे सासरे मोहन गुंडावले यांनी सांगितले की, “रविवारी स्थानिक वृत्तपत्रात त्याच्या मृतदेहाचे छायाचित्र पाहेपर्यंत आम्हाला त्याच्या मृत्यूची माहिती देण्यात आली नव्हती. आम्हाला फक्त माहीत होते की तो जखमी झाला होता आणि रुग्णालयात होता. आम्ही सकाळी सरकारी रुग्णालयात धाव घेतली जिथे आम्हाला त्याचा मृतदेह दिसला,”

Akola Clashes
Crime News : गुरुद्वाराच्या परिसरात मद्यपान केल्याबद्दल महिलेची हत्या

कुटुंबातील एकमेव कमावता असलेला विलास, अकोल्यातील भगतसिंग नगर येथे पत्नी आणि तीन मुलांसह 10×10 चौरस फूट खोलीत राहायचा, गेल्या वीस वर्षांपासून तो इलेक्ट्रिशियन म्हणून काम करायचा.

शनिवारी रात्रीही तो जवळच्या वस्तीत तुटलेले विद्युत उपकरण दुरुस्त करण्यासाठी बाहेर पडला होता. गायकवाड हा दंगलखोर जमावाचा एक भाग असल्याचा पूर्वी विश्वास असलेल्या पोलिसांनी सांगितले की, घरी परतत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. (Crime News)

Akola Clashes
Koregaon Bhima Voilence : 'हे कलम गरजेचे आहे का?', पवारांनी मांडली भूमिका

“त्याला या घटनेची कल्पनाही नव्हती आणि तो घरी परतत असताना एका गटाने त्याच्यावर कथित हल्ला केला,” असे अकोल्यातील जुने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी सांगितले, जिथे त्याच्या हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेजाऱ्याने याबाबत माहिती दिल्यानंतर गायकवाड जखमी झाल्याचे कुटुंबीयांना वाटले असा त्यांनी दावा केलाय. "आम्हाला वाटलं की त्याला काही किरकोळ दुखापत झाली असावी... तो त्याच्या मित्राच्या घरी गेला असावा असं मानून आम्ही रात्री त्याला शोधण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाल्याचे आम्हाला समजले, असे विलासची पत्नी राजकर्ण्या म्हणाली. (Akola)

“विलास फारसा शिकलेला नव्हता पण तो कुठलीही गोष्ट लवकर शिकणारा होता, असे गायकवाडचा मित्र सचिन अंबास्कर म्हणाला. विलासने इयत्ता आठवीत शिक्षण सोडले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.