अकाेला : पावसाचा प्रत्येक थेंब जीवनासाठी आवश्यक

षण्मुगराजन एस. : ‘कॅच द रेन’ मोहिमेच्या कामाचा आढावा
Akola Collector Catch the Rain campaign
Akola Collector Catch the Rain campaign
Updated on

वाशीम : पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत जिरविणे काळाची गरज आहे. ग्रामीण आणि शहरी भागात या पावसाळ्यात वृक्ष लागवडीची कामे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शोषखड्डयांची तसेच बोअरवेल दुरुस्तीच्या कामातून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात यावी. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.

आज ४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जलशक्ती अभियानाअंतर्गत कॅच द रेन मोहिमेचा आढावा घेतांना षण्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक कडू, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वानखेडे, सहायक वनसंरक्षक राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

काही गावांजवळ असलेल्या तलावातील गाळ ग्रामस्थांच्या सहभागातून काढून पाणीसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. प्रत्येक पंचायत समितीने ग्रामपंचायत अंतर्गत ५० हजार ते १ लक्ष वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. खाजगी इमारतीला बांधकामाची परवानगी देतांना रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम करणे बंधनकारक करावे. विहीर पुनर्भरणाची कामे तसेच नादुरुस्त बोअरवेल दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात यावी. रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे कमीतकमी खर्चात करण्यात यावी. प्रत्येक ग्रामसेवकाला खाजगी इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या दोन कामाचे उद्दिष्ट देण्यात यावे. ज्या गावामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांची घरे आहेत, त्यांच्या इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे देखील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात हाती घ्यावी. असे सांगून षण्मुगराजन म्हणाले, वृक्ष लागवडीचे नियोजन करतांना खड्डे तयार करण्याची पुर्वतयारी करण्यात यावी. जलसंधारणाची ही सर्व कामे सप्टेंबर २०२२ पूर्वी पुर्ण करण्यात यावी. जी कामे झाली आहेत, ती सर्व कामे संकेतस्थळावर अपलोड करण्यात यावी. ज्या विभागांनी अद्यापही कॅच द रेन मोहिमेअंतर्गत आराखडा सादर केलेला नाही, त्यांनी आराखडा तात्काळ सादर करावा, असे षण्मुगराजन म्हणाले.

पंत म्हणाल्या, मनरेगा योजनेतून प्रत्येक गावामध्ये १० शोषखड्डयांची कामे करण्यात यावी. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये वृक्ष लागवडीचे पूर्व नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात नव्याने बांधण्यात येणाऱ्या अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जलसंधारणाची विविध विभागाची ४ हजार ३२२ कामे पुर्ण झाल्याची माहिती आकोसकर यांनी दिली. कृषी विभाग, नगरविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, मृद व जलसंधारण विभाग, वन विभाग आणि पंचायत समितीअंतर्गत करण्यात आलेल्या आणि करण्यात येणाऱ्या जलसंधारण कामांची माहिती यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. या सभेला सर्व नगरपालिका व नगरपंचायतचे मुख्याधिकारी, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.