अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी आता पुढील आदेश येईपर्यंत दर रविवारी संपूर्ण संचारबंदी तसेच दररोज रात्रीची संचारबंदी, वाहनांतून प्रवास करताना वाहनातील प्रवाशी संख्येवर मर्यादा, गर्दीच्या ठिकाणी कोरोणा प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन या व अन्य बाबींवर जोर देण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.
पुढील येणाऱ्या प्रत्येक रविवारी संपूर्ण दिवसभर संचारबंदी असेल. शनिवार रात्री ८ ते सोमवारचे सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण अकोला जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत संपूर्णतः संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत कोणत्याही व्यक्तीस मुक्त संचार करता येणार नाही. रात्रीची संचारबंदी- संचारबंदीच्या आदेशाचे पालन करताना कुठल्याही व्यक्ती, नागरिकांना हालचाल करण्याकरिता व मुक्त संचार करण्याकरिता फौजदारी प्रक्रिया संहिता पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात आले आहेत.
हेही वाचा - - Corona Update : पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी
संचारबंदीत याबाबींना सुट
आणखी २३५ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात कोरोना संसर्ग तपासणीचे ८१४ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ५७९ अहवाल निगेटीव्ह तर २३५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान ४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज सकाळी ४९० तर सायंकाळी ३२४ अहवाल प्राप्त झाले. त्यात सकाळी प्राप्त अहवालानुसार १२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. सायंकाळी १११ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. सध्या जिल्ह्यात १४०७ जणांवर उपचार सुरू आहेत.
अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा
संपादन - विवेक मेतकर
अधिक वाचा -
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.