अकोला ः कोरोना संसर्गामुळे गुरूवारी (ता. ८) तीन रूग्णांचा बळी गेला. याव्यतिरिक्त २९८ नवे रूग्ण आढळले. त्यासोबतच २८७ जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या ३७७१ झाली आहे.
कोरोना संसर्ग तपासणीचे गुरुवारी (ता. ८) जिल्ह्यात १ हजार ९१९ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ७३३ अहवाल निगेटिव्ह तर १८३ अहवाल आरटीपीसीआरच्या तपासणीत तर ५६ अहवाल रॅपिडच्या तपासणीत पॉझिटिव्ह आले. याव्यतिरिक्त तीन रूग्णांचा मृत्यू सुद्धा झाला. संबंधित तिन्ही रुग्ण महिला आहेत. त्यात अकोट फैल येथील ४७ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. या महिलेस ८ एप्रिल रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते. दुसरा मृत्यू एक कासारखेड ता. बार्शीटाकळी येथील ६५ वर्षीय महिलेचा झाला. या महिलेस ३ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. तिसरा मृत्यू अन्य अकोट येथील ६२ वर्षीय महिलेचा झाला. तिला २९ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. सदर तीन मृत्यूनंतर आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण मृतकांची संख्या ४८९ झाली आहे.
------------------
या भागात आढळले नवे रूग्ण
गुरुवारी सकाळी १३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ४३ महिला आणि ८७ पुरुषांचा समावेश आहे. त्यात मोठी उमरी येथील ९, रामदास पेठ व जीएमसी येथील प्रत्येकी ९, मलकापुर आणि पोलिस हेडक्वार्टर येथील प्रत्येकी पाच व इतर भागातील रहिवाशी रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी ५६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १३ महिला व ४३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील सहा, मूर्तिजापूर येथील पाच, कौलखेड, मलकापूर, पारस येथील प्रत्येकी तीन व इतर भागातील रहिवाशी रूग्णांचा समावेश आहे.
-----------------
कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - २९८५६
- मृत - ४८९
- डिस्चार्ज - २५५९६
- ॲक्टिव्ह रूग्ण - ३७७१
(संपादन - विवेक मेतकर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.