Akola : सर्वसाधारण सभेत कंत्राटदार, अधिकाऱ्यांना केले ‘लक्ष्य’!

भ्रष्टाचाराचे आरोप-प्रत्यारोप; पाणीपुरवठा, कुत्र्यांचे निर्मुलन, स्वच्छतेच्या विषयावर वादळी चर्चा
Akola : सर्वसाधारण सभेत कंत्राटदार, अधिकाऱ्यांना केले ‘लक्ष्य’!
Akola : सर्वसाधारण सभेत कंत्राटदार, अधिकाऱ्यांना केले ‘लक्ष्य’!sakal News
Updated on

अकोला : महानगरपालिकेत नव्यानेच रूजू झालेल्या आयुक्त कविता द्विवेदी यांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी मनपातील कंत्राटदार व अधिकाऱ्यांना लक्ष्य करीत भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यातून गुरुवारी झालेल्या या ऑनलाइन सभेत चांगलेच वाक् युद्ध रंगले. थेट बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनाच धारेवर धरण्यात आले. सत्ताधारी भाजपच्या शहरातील दोन आमदारांवरूनही विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न केल्याने सभा चांगलीच गाजली.

ईतीवृत्ताच्या मंजुरीपासूनच सभेतील वादाला सुरुवात झाली. त्यानंतर मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरून सभेत भाजप नगरसेवक बाळ टाले, विनोद मापारी, आशीष पवित्रकार, शिवसेनेच्या नगरसेविका मंजुषा शेळके, सपना नवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे रहिम पेंटर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यात विरोध पक्ष नेत्यांच्या वक्त्याव्याने ऑनलाइन सभेत गोंधळ घातला. कुत्र्यांचे प्रश्न सोडविता येत नसेल तर माणसांचे प्रश्न कसे सोडविणार असा प्रश्न साजित खान यांनी उपस्थित केला. खासदार, आमदारांच्या बैठकीत चुप्पी साधणारे नगरसेवक मनपाच्या सभेत गळा आवळून ओरडत असल्याचा टोलाही त्यांनी भाजप नगरसेवकांना लगाविला. त्यावरूनही दोन्ही कडून शाब्दिक वाद सुरू झाला. त्यात काँग्रेसचे नगरसेवक नौशाद यांनी पाणीपुरवठा विभागातील जलवाहिनी दुरुस्तीची कामे करणारे कंत्राटदार संजय अग्रवाल यांच्यावर बोगस देयके काढत असल्याचा आरोप केला.

या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणीही त्यांनी केली. हा विषय सुरू असतानाच तांत्रिक बिघाड झाला. कुणाचेही कुणाला ऐकू येत नसल्याने महापौरांनी सभा १० मिनिटासाठी तहकुब केली. त्यानंतर पुन्हा सभा सुरू झाल्यावर विषय सुचितील इतर विषयांना मंजूर देण्यात आली. विषय सूचिवरील चौथ्या क्रमांकाच्या विषयावर चर्चा सुरू असताना मनपा विरोधी पक्ष नेत्यांनी मनपाच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर यांच्यावर प्रहार व वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांसोबत मिळून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या प्रभागातील कामे थांबविली जात असल्याचा आरोप केला. त्यावर गुजर यांनी उत्तर देताना समाधानकारक उत्तर न दिल्याने आयुक्तांनी आढावा घेवून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

पाच वेळा उद्‍भवले वादाचे प्रसंग!

  • इतिवृत्तीवर चर्चा करण्यावरून शिवसेना गटनेते ऑनलाइन सभा असतानाही थेट महापौरांच्या दालनात पोहोचले. सोबत विरोधी पक्ष नेते साजित खान पठाणही तेथे पोहोचल्याने सभेत व्यत्‍य आला.

  • मनपा विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांना सभेत चर्चा सुरू असताना ‘ बात कुत्तो की चालू आहे, इन्सानों के तरी बोलो’ असे म्हणताच सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला. चर्चेदरम्यान बराच गोंधळ व आरोप पत्यारोप झाले.

  • मनपाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर हे प्रहार व वंचित बहुजन आघाडीच्या काही नेत्यांच्या सांगण्यावरून नगरसेवकांची कामे थांबवित असल्याचा आरोप साजित खान यांनी केला. त्यावरूनही वादाचा प्रसंग उद्‍भवला.

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रहिम पेंटर यांनी त्यांच्या प्रभारात कामे करण्यास सत्ताधाऱ्यांकडून विरोध होत असल्याचा आरोप केला. तेव्हा शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवकांनी माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या काळात तुम्ही ‘चॉकलेट’ खाल्ले आता का रडता म्हणून त्यांची टर उडविण्याचा प्रयत्न केल्याने वादाचा प्रसंग उद्‍भवला होता.

  • शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या निधीतून करण्यात येत असलेल्या विकास कामांवरून शहरातील इतर भागात विकास निधी आमदारांनी द्यावा, असा टोला काँग्रेसचे साजिद खान व भाजपच्या इतर नगरसेवकांनी लगावल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केला व आमदारांनी इतर भागातही निधी कसा दिला हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला.

या विषयांना दिली मंजुरी

  • मनपा कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधावर निर्णय घेण्यासाठी समिती गठित करणे.

  • रेल्वेला जागा हस्तांतरीत करण्यास मंजुरी देणे.

  • मनपा कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या जागांबाबत न्यायालयाच्या निर्णयाला अधिन राहून भाटेपट्टा करार वाढविणे. याबाबत काढण्यात आलेली ई-निविदा रद्द करणे.

  • वृक्षगणणा करणे, ओडीएफ प्लस व ओडीएफ प्लस प्लस मान्यता देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे.

  • स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या महिला बचत गटाची देयक काढण्यात यावी.

  • जातीवाचक वाडी-वस्त्यांची नावे बदलण्यासाठी समिती गठित करणे. नावांची यादी सभागृहापुढे ठेवणे.

शेरोशायरीने गाजली सभा

मनपाच्या ऑनलाइन सभेत मनपा विरोधी पक्ष नेते यांनी शेर सांगून कामकाजावर टीका करतानाच सभेत तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी....

झूठों ने झूठों से कहा है सच बोलो

सरकारी एलान हुआ है सच बोलो

घर के अंदर तो झूठों की एक मंडी है

दरवाज़े पर लिखा हुआ है सच बोलो

गुलदस्ते पर यकजहती लिख रक्खा है

गुलदस्ते के अंदर क्या है सच बोलो

गंगा मइया डूबने वाले अपने थे

नाव में किसने छेद किया है सच बोलो...

हा शेर यावेळी सादर केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()