Akola Crime: बसमधून रोख रक्कमेसह १३.३३ लाखांचे दागिने लंपास! ३ तरुणांनी अशी केली चोरी

बॅगमधून सुमारे १० लाख ५० हजार रुपयांचे दागिने आणि दोन लाख ८० हजार रुपये रोख अज्ञात चोर घेवून पसार झाल्याची घटना शनिवारी (ता. १०) घडली. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Akola Crime: बसमधून रोख रक्कमेसह १३.३३ लाखांचे दागिने लंपास! ३ तरुणांनी अशी केली चोरी
Updated on

Assets of Worth 13 Lakhs Stolen From Bus: अकोला मध्यवर्ती बस स्थानकावरून जाण्यासाठी निघालेले लहान उमरी येथील रहिवाशी सतीश बापूराव गंगाळे (वय ६० वर्ष) यांच्या बॅगमधून सुमारे १० लाख ५० हजार रुपयांचे दागिने आणि दोन लाख ८० हजार रुपये रोख अज्ञात चोर घेवून पसार झाल्याची घटना शनिवारी (ता. १०) घडली. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिव्हिल लाईन पोलिस स्टेशन हद्दीतील लहान उमरी येथील रहिवाशी कंत्राटदार सतीश बापूराव गंगळे (वय ६०) हे पत्नी व कुटुंबीयांसह शनिवारी (ता. १०) औरंगाबाद येथे लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी निघाले होते. सकाळी ८.३० वाजता वाजता सर्व गंगाळे कुटुंबीय मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पोहोचले आणि मूर्तिजापूर शिर्डी बसमध्ये चढले.

यावेळी त्यांच्या मागून तीन ते चार तरुण बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी संबंधित तरुणांनी गंगाळे यांची बॅग आणि ब्रीफकेस बसमध्ये चढवण्यास मदत केली. सदर तरुण गंगाळे कुटुंबीयांच्या मागील सीटवर बसले आणि त्यांनीच गंगाळे कुटुंबाच्या दोन बॅग आणि ब्रीफकेस बसमध्ये ठेवल्या. बस गाडी स्थानकातून बाहेर पडल्यानंतर तरुणांनी वाशीमला जायचे सांगून बसला शहरातील वाशीम बायपासजवळ थांबवले आणि ते बस मधून खाली उतरले. (Latest Marathi News)

दरम्यान, सतीश गंगाळे हे बॅग पाहण्यासाठी उभे राहिले असता त्यांना बॅगेतून रोख रक्कम व दागिने लंपास झाल्याचे दिसून आले. त्यात बॅगमधील मंगळसूत्र, नेकलेस, सोन्याच्या बांगड्या, सोन्याचा नेकलेस, कानातील टॉप, सोन्याच्या चार अंगठ्या, दोन मोठा हार, दोन मोठ्या बांगड्या आणि पाचशे रुपयांच्या पाच नोटांचे बंडल व १३ लाख ३३ हजार रुपयांचे दागिने घेवून चोर पसार झाले. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Akola Crime: बसमधून रोख रक्कमेसह १३.३३ लाखांचे दागिने लंपास! ३ तरुणांनी अशी केली चोरी
Maharashtra Rain Update : आज राज्याच्या ‘या’ भागांमध्ये कोसळणार अवकाळी पाऊस! मराठवाडा-विदर्भासाठी हवामान खात्याचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.