Akola Crime: सराईत चेन स्नॅचरला ठोकल्या बेड्या, साताऱ्यातून एलसीबीने आवळल्या मुसक्या

Satara Crime: अटक केलेल्या आरोपीवर तब्बल १९ गुन्हे दाखल आहेत. एलसीबीच्या पथकाने आरोपीच्या सातारा जिल्ह्यातून मुसक्या आवळल्या.
Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष
Navi Mumbai Crimesakal
Updated on

Latest Crime NEws: महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या सराईत चोराला अकोला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्या आरोपीवर तब्बल १९ गुन्हे दाखल आहेत.

एलसीबीच्या पथकाने आरोपीच्या सातारा जिल्ह्यातून मुसक्या आवळल्या. गत १५ दिवसांमध्ये चेन स्नॅचिंगच्या तीन घटना शहरात घडल्यानंतर आरोपीला गजाआड करण्यासाठी एलसीबीचे पथक रवाना झाले होते. आणि त्यात अकोला पोलिसांना यश आल्याची माहिती एलसीबीचे प्रमुख शंकर शेळके यांनी दिली.

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष
Akola Crime : नात्याला काळिमा फासणारी घटना! तामसवाडीत बालिकेवर मामाकडून अत्याचार

सादिक अली इबाबत अली इराणी (वय २०, रा.पापा नगर, रजा टॉवर जवळ, भुसावळ, जि. जळगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शहरातील शास्त्री नगर भागात १९ ऑगस्ट रोजी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना घडली होती.

महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून दोन चोरटे दुचाकीवरून फरार झाले होते. सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २२ ऑगस्ट उमरी परिसरात दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील चेन ओरबाडून नेली होती.

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष
Akola : लैंगिक छळाचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे; वंचित बहुजन महिला आघाडीची मागणी

त्यानंतर लगेच १ तासाच्या अंतराने जुन्या शहरात चेन स्नॅचिंगची घटना घडली होती. रामनगर परिसरात २२ ऑगस्ट रोजी एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन दोन दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेली होती.

या तिन्ही घटनांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांनी हाती घेत आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. घटना घडलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पाेलिसांनी आरोपींची ओळख पटविली.

दरम्यान, तपास सुरू असताना आरोपी सादिक अली इबाबत अली इराणी हा सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. या माहितीच्या आधारे एलसीबीचे प्रमुख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात पथकाने आरोपीच्या साताऱ्यातून मुसक्या आवळल्या.

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष
Akola Traffic : 6 लाख वाहनांसाठी अवघे ३५ 'पोलिस' दलात कर्मचाऱ्यांची वाणवा, वाहतूक नियमनाकडे होतेय दुर्लक्ष

या पथकाचा कारवाईत सहभाग

पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे प्रमुख शंकर शेळके, सहायक पोलिस निरीक्षक विजय चव्हाण, उपनिरीक्षक गोपाल जाधव, अमंलदार रवींद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, वसिमोद्दीन, निमराय दिपके, प्रशांत कमलाकर, राहुल गायकवाड, सायबर शाखेचे अंमलदार गोपाल ठोंबरे, आशिष आमले यांच्या पथकाने ही मोहीम पार पाडली.

तीन गुन्हे उघडकीस

आरोपीवर भुसावळ (जि. जळगाव) येथे ६ गुन्हे, जळगाव शहर येथे २ गुन्हे, मध्यप्रदेश, वाकड, पिंपरी चिंचवड, जामनेर, रत्नागिरी, कोथरूड, खामगाव, पंतनगर मुंबई, अहमदनगर येथे प्रत्येकी १ गुन्हा असे एकूण १९ गुन्हे दाखल आहेत. अकोला जिल्ह्यात ३ गुन्हे केल्याची कबुली आरोपीने दिली.

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष
Akola Crime: अकोल्यातही बदलापूरची पुनरावृत्ती; शिक्षकाने अश्लील व्हिडिओ दाखवत केला सहा विद्यार्थिनींचा छळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.