सावधान तुमची होऊ शकते फसवणूक! महिलेला गुगलवर सर्च करणे पडले दोन लाखांत

Akola Crime News Cyber crime fraud woman had to search on Google for Rs 2 lakh
Akola Crime News Cyber crime fraud woman had to search on Google for Rs 2 lakh
Updated on

अकोला :  एका महिलेने बुक केलेले विमानाचे तिकीट रद्द करून पैसे परत मिळणेकरिता ग्राहकसेवा केंद्राला संपर्क साधला असता सायबर भामट्याने डाव साधून महिलेच्या खात्यातील दोन लाख रुपये काढून घेतले. अकोला सायबर पोलिसांनी या महिलेचे पैसे परत मिळवून दिली आहे.


महिलेने विमान प्रवाशाचे तिकिट रद्द केल्यानंतर पैसे परत मिळविण्यासाठी गुगलवर ग्राहक सेवा केंद्राचा नंबर शोधला. त्यावर कॉल केला. स्वत:ला ग्राहक सेवा केंद्र प्रतिनीधी सांगणाऱ्या भामट्याने सदर महिलेच्या मोबाईलवर एसएमएसव्दारे एक लिंक पाठवून ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. महिलेने त्या ग्राहक सेवा केंद्रच्या प्रतिनीधीने सांगितल्या प्रमाणे लिंकवरून क्लीक करून ॲप डाउनलोड केला. ॲपचे नाव एनीडेक्स असे होते.

ते अप्लीकेशन उघडून त्यावर असलेला ॲक्सेस कोड सदरच्या ग्राहक सेवा केंद्रच्या प्रतिनीधीने विचारला. ॲक्सेस कोड महिलेने ग्राहक सेवा केंद्रच्या प्रतिनिधीला सांगितला असता थोड्याच वेळात त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँक खात्यामधून दोन वेळा ९९ हजार ९९९ असे एकूण १ लाख ९९ हजार ९९८ काढून घेतले.

ही बाब महिलेच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ सायबर पोलिस स्टेशनशी संपर्क करून झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. पोलिसांनी तपास करून महिलेचे पैसे परत मिळवून दिले. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनाखली सायबर पो. स्टे. सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, पोलिस उपनिरीक्षक दीपक सोळंके, पो.शि. गणेश सोनोने, ओम देशमुख, अतुल अजने यांनी केली.

हेही वाचा - 21 वर्षांत चार नाही तर चौदा झालेत सरपंच
असा घेतला शोध
पोलिसांनी महिलेच्या बँक स्टेटमेंट बघितले असता त्यावरून सदर रक्कम ही पेटीएमला वळती झाल्याचे लक्षात आले. या प्रकाराबाबत पेटीएमला कळविण्यात आले. उपरोक्त रक्कम ही सदर महिलेस परत करण्यात कळविण्यात आलेले आहे.

ग्राहक सेवा केंद्रच्या प्रतिनीधीचे लोकेशन पाहिले असता ते दुर्गापूर, पश्चिम बंगाल असे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून दुर्गापूर, पश्चिम बंगाल येथील पोलिसांशी संपर्क करून त्या बनावट ग्राहक सेवा केंद्रच्या प्रतिनिधीचे मोबाईल क्रमांक व लोकेशन कळविण्यात आले.

त्यावरून दुर्गापूर, पश्चिम बंगाल पोलिसांनी सदर ठिकाणी शोधले असता त्यांना सात जणांची एक टोळी व त्यांचेकडून २२ मोबाईल मिळून आले. सदर टोळीला ताब्यात घेवून विचारपूस केली असता, त्यांनी आपणस सदर महिलेची फसवणूक केल्याची कबुली दिली. सदर टोळीकडून महिलेचे १ लाख ९९ हजार ९९८ जप्त करण्यात आलेले असून, तपास सुरू आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.