अकोला : चौकीदारीचे काम करणाऱ्या युवकाने कपड्यावर वर्क काम करणाऱ्या महिलेचे कपडे बदलतानाचे फोटो, व्हिडीओ व्हायलरकरीत बदनामी करण्याची धमकी दिली. त्याबदल्यात पैसे मागितले. त्यानंतर तिच्यावर बळजबरी करीत लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार सातत्याने सुरू होता. शेवटी पैसे संपल्याने तिने देण्यास नकार दिला.
तरी शरीर सुखाची मागणी सुरूच होती. अखेर महिलेने आत्यमहत्येचा प्रयत्न केला. फिर्यादी महिलेल्या जबाबानंतर आरोपी तरूणाविरुद्ध सिव्हिल लाईन्स पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सविस्तर माहिती अशी की, सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या एका प्रतिष्ठीत नागरी वस्तीतील उद्योगात ३४ वर्षीय विवाहित महिला कपड्यावर वर्क करण्याचे काम करते. तेथेच २४ वर्षीय कैलास अशोक धाबे (रा. कृषिनगर) हा चौकीदारीचे काम करतो. त्याने फिर्यादीस तिचे कपडे बदलण्याचे फोटो व्हायरल करतो असे म्हणून तिला पैशाची मागणी केली.
फिर्यादीने त्यास तिच्याकडील सोन्याचे दागिने दिले. तरी सुद्धा आरोपी हा तिला नेहमी पैशाची मागणी करीतच होता. तिच्याकडे पैसे नसल्यामुळे तिने आरोपीस पैसे देण्याचे टाळले. त्यासोबत फोनवरून सुद्धा संपर्क बंद केला. आरोपीने फिर्यादीस शरीर सुखाची मागणी केली. ती काम करत असलेल्या ठिकाणी एका खोलीत जबरदस्तीने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला.
त्यानंतर सुद्धा वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. त्यावेळेसचे फोटो सुद्धा आरोपीने काढले. ते प्रसार माध्यमांवर प्रसारित करतो अशी धमकी देत होता. फिर्यादी ही संबंध ठेवत नसल्याने आरोपी हा विवाहीतीचे घरी जाऊन बाहेरून दगड फेकून मारला. त्यावेळी तिचे सासरे बाहेर आले व त्यांनी आरोपीला तेथून पळताना बघितले. फिर्यादीने सासऱ्यांना सर्व हकीकत सांगितली. सासऱ्याने नमूद आरोपी यास विचारला असता त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे फिर्यादीने उंदराचे औषध घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
या कलमांतकर्गत केला गुन्हा दाखल
फिर्यादीचे जबाब वरून पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६ (दोन, एन), ३३२, ३३६, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास सिव्हिल लाईन्सचे ठाणेदार पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
महिलांनो रहा साधव
कामाच्या ठिकाणी किंवा घरीसुद्धा वावरतांना महिलांनी आजूबाजूला लक्ष ठेवावे. काही अनियमितता आढळल्यास किंवा कुणी त्रास देत असल्यास तत्काळा पोलिसांशी संपर्क साधावा. त्यामुळे पुढील अनर्थ टाळता येऊ शकतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.