Akola Crime News
बाळापूर : बदलापूर येथील नामांकित शाळेतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने सहा मुलींचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी संध्याकाळी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षक शाळेत मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवायचा.