Akola Crime : अवैध मद्य विक्री करणारे पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात

आरोपीकडून एक लाख ७९ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त
akola crime police arrested 5 person in case of illegal liquor sales
akola crime police arrested 5 person in case of illegal liquor salesesakal
Updated on

अकोला : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य विक्री करणाऱ्या पाच जणांना अटक केली असून, आरोपीकडून एक लाख ७९ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात डाबकी रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील डाबकी रेल्‍वे गेट परिसरात अवैध दारुचा साठा जप्त केला. या कारवाईत विवेक अनिल मालगे (३०), यशवंत राजू करनेवार (२६) दोघेही रा. बाळापूर नाका गुरुदेव नगर, जुनेशहर या दोन आरोपीकडून ६३ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

akola crime police arrested 5 person in case of illegal liquor sales
Akola News : विकासकामांसाठी ४.९० कोटी प्राप्त; आमदार स्थानिक विकास कार्यक्रमानुसार मिळाला निधी

दुसऱ्या कारवाईत बाळापूर बेस वाडेगाव येथील सचिन गोविंदा अवारे (३५) आणि सुनील गणेश रहाटे (४३) या आरोपीकडून ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रिधोरा गावात हुंडाई शोरूम जवळ रविराज अन्ना तायडे (२८) या आरोपीकडून ५८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

akola crime police arrested 5 person in case of illegal liquor sales
Akola News : अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ‘ड्रेस कोड’; जि.प. शिक्षण समितीच्या सभेत निर्णय

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात एएसआय राजपालसिंग ठाकूर, दशरथ बोरकर, फिरोज खान, गोकुळ चव्हाण, विशाल मोरे, अविनाश पाचपोर, महेंद्र मलिये, खुशाल नेमाडे, आकाश मानकर, धीरज वानखडे, अन्सार अहेमद, मो. आमीर, अभिषेक पाठक आदींनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.