अकाेला : गौण खनिज माफियांनी खिशात घातले प्रशासन

तालुक्यातील विटभट्ट्यांचे व्हावे ऑडिट; पं.स. सदस्याच्या लेखी पाठपुराव्याला केराची टोपली
Akola Demand for action Illegal sand excavation and transportation
Akola Demand for action Illegal sand excavation and transportationsakal
Updated on

कारपा : गावा शेजारील गिद जल प्रकल्पातील शेकडो ब्रास (माती) गौण खनिजाचे स्वामित्वधन न भरता अवैधरीत्या उत्खनन, वाहतूक, साठा आणि वापर करणाऱ्या वीटभट्टी मालकांची पाठराखण करणाऱ्या साठेबाजांवर दंडात्मक कारवाई करण्याची वारंवार मागणी करूनही त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात पंचायत समिती सदस्या छाया राठोड १३ जून पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणानंतर तालुक्यातील गौण खनिज माफियांनी प्रशासन खिशात घातले की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

(गिद) खापरदरी ता. मानोरा या जलप्रकल्पातील हजारो ब्रास (माती) गौण खनिजाचे उत्खनन,वापर आणि साठा जोगलदरी-सिंगडोह रस्त्यावरील एक, जोगलदरी मंगरूळनाथ महामार्गावरील पाच तथा कवठळ आणि इतरही वीटभट्टी मालक करीत असल्याचे लेखी निवेदन ऊपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना देऊन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी मानोरा पंचायत समितीच्या सदस्या छाया राठोड यांनी अनेकदा केलेली आहे व इतरही काही नागरिकांनी केलेली आहे.

मानोरा आणि मंगरूळनाथ तालुक्यातील पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास (माती) व गौण खनिजाचे उत्खनन केल्यानंतर आता या बेकायदेशीर विटभट्टी मालकांनी धरणातील (माती) गौणखनिजाचा वापर शेतीमध्ये माती टाकत असल्याच्या नावाने उत्खनन, वाहतूक, वापर आणि साठा मागील अनेक वर्षांपासून करून कोट्यवधी रुपयाचा शासनाचा महसूल बुडविला असल्याची तक्रार राठोड यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना करून संबंधित वीटभट्ट्यांवरील (मातीची) गौण खनिजाचे मोजमाप करण्यात येण्याची मागणी केली होती. त्यावर दंडात्मक कारवाई करण्याची लेखी मागणी अनेकदा करूनही प्रशासनाकडून सतत या लेखी निवेदनाकडे डोळेझाक करून वीटभट्टी मालकांना मूक संमती आणि प्रोत्साहन देण्यात येत असल्याच्या विरोधात पं. स. सदस्य राठोड या महसूल विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या धोरणाविरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगरूळनाथ येथे दि. १३ जून रोजी पासून आमरण उपोषणाला प्रारंभ करणार आहेत. असा इशारा देण्यात आला आहे.

लाखो रुपये कोणाच्या खिशात

अवैध उत्खनन करून गौण खनिजाचे स्वामित्व सरकारजमा न करता महसूल विभागाचे काही कर्मचारी मालामाल झाले आहेत. गौणखनिज माफियांनी हे प्रशासन पाळले की काय असा संशय व्यक्त केला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबीची गंभीरतेने दखल घेण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.