अकोला : महावितरण अकोला परिमंडळाअंतर्गत राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवाडा या उपक्रमात सहा हजार १७७ घरगुती वीज ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय ग्राहकांच्या मागणी अर्जानुसार ६४२ वीज ग्राहकांच्या नावात बदल करण्यात आले आहे.
नागरिकांच्या प्रलंबित अर्जाचा स्थानिक पातळीवर निपटारा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात ता.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर दरम्यान ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा’ उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या सेवा पंधरवाड्यात विविध विभागातील १४ सेवांबाबत असलेल्या प्रलंबित अर्जाचा जलदगतीने निपटारा करण्याचे उध्दिष्ट ठेवण्यात आले होते. या सेवामध्ये प्रलंबित घरगुती वीज जोडणी आणि मालमत्ता हस्तांतराणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव जोडणे या महावितरणच्या दोन सेवांचा समावेश होता.
अकोला जिल्ह्यात १८०० वर जोडण्या
महावितरण अकोला परिमंडळाअंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमात प्रलंबित असलेल्या एकून ६ हजार १७७ नविन घरगुती ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली आहे.यामध्ये अकोला जिल्ह्यात १ हजार ८९७, बुलढाणा जिल्ह्यातील २ हजार ५९९, तर वाशिम जिल्ह्यातील १ हजार ६८१ प्रलंबित नविन वीज जोडण्याचा समावेश आहे.याशिवाय ६४२ ग्राहकांच्या नावात बदल करण्यात आला आहे.यामध्ये अकोला जिल्ह्यातील २८८,बुलढाणा जिल्ह्यातील २२१, तर वाशिम जिल्ह्यातील १३३ ग्राहकांचा समावेश आहे.याशिवाय परिमंडळातील ४०६ ग्राहकांच्या वीज जोडणीच्या नवीन अर्जावर कार्यवाही करत त्यांना पैसे भरण्याबाबत कोटेशन देण्यात आलेले आहेत. या ग्राहकांनी पैसे भरल्यानंतर त्यांना तत्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.