Akola : मध्यप्रदेशला जोडणारा मार्ग आठ तास बंद!

लोहारा जवळील पुलावर ट्रकचा पाटा तुटल्याने वाहतूक खोळंबली
Akola
Akolasakal
Updated on

बाळापूर : अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील शेगाव-अकोट राज्यमार्गावरील लोहारा गावाजवळ ट्रकचा पाटा तुटल्याने तब्बल आठ तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांसह शेतकरी व प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

लोहारा गावाजवळील मन नदीच्या पुलावर ब्रिटीशकालीन पूल आहे. गत काही महिन्यांपासून या महामार्गावर व पुलावर मोठ-मोठे खड्डे पडले असून, खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात अकोटवरून धुळेकडे सोयाबीन घेऊन जात असलेला एमएच-२८-एए-८०१६ या क्रमांकाच्या ट्रकचा पाटा तुटल्याने सदर ट्रक पुलावरच बंद पडला. हि घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली, त्यामुळे पहाटे चार वाजतापासून शेगाव-अकोट राष्ट्रीय महामार्ग हा वाहतुकीस बंद पडल्यामुळे प्रवासी, शेतकरी, विद्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागला.

शेगाव-अकोट हा मार्ग अकोला, बुलडाणा, अमरावतीसह मध्यप्रदेशला जोडणारा मार्ग आहे. अकोला आणि बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवरील मन नदीवर ब्रिटीश कालीन पूल बांधलेला आहे. सदर पूल नादुरुस्त असून, या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम गत दोन वर्षांपासून सुरू आहे; मात्र सदर बांधकाम संथ गतीने सुरू असल्याने याचा फटका वाहन चालकांना बसत आहे. या दोन वर्षात या पुलावर अनेक घटना घडल्या आहेत, तर याठिकाणी अपघाताच्या घटनेत एका जणाचा मृत्यू देखील झाला आहे. अनेकदा हा मार्ग बंद पडतो, तरीही संबंधित विभाग कुंभकर्णी झोपेतून कधी जागा होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अकोला-शेगाव मार्गे प्रवास नको रे बाबा...!

अकोला-शेगाव मार्गावरून प्रवास करणे प्रवाशांसाठी मोठे दिव्य आहे. निंबा फाटा मार्गे प्रवास करणे म्हणजे खराब रस्त्यामुळे अपघाताला सामोरे जाणे नित्याचे बनले आहे. लोहार पुलाजवळील रस्ता सर्वाधिक खराब झाला आहे. या रस्त्याची दुरुस्ती केवळ तात्पुरती केली जात आहे. या मार्गावर २०० हून अधिक खड्डे असून, दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. प्रशासनाने लवकरच ह्या मार्गावरील रस्ते दुरुस्ती करून वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणी होत आहे.

अथक परिश्रमानंतर ट्रक दुरुस्ती

पुलावर रस्त्याच्या मध्यभागी ट्रक बंद पडल्यामुळे अकोला-शेगाव मार्गावरील वाहतूक तब्बल आठ तास विस्कळीत झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच-रांगा लागल्या होत्या. वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी उरळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनंतराव वडतकार व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. ट्रक चालकांशी चर्चा केल्यानंतर ट्रक तत्काळ सुरू होणार नाही हे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे काही छोटी वाहने पोलिसांनी पर्यायी मार्गाने वळवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()