Akola News : कृषी विषयक विकसित तंत्रज्ञान शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे व शेतकरी शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार विपणन साखळी विकसित करण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहचविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले.
जिल्हा कृषी महोत्सवा संदर्भात सोमवारी (ता. १२) आढावा बैठक नियोजन भवनात जिल्हाधिकारी कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात तीन दिवस चालणाऱ्या कृषी महोत्सवातील कृषी प्रदर्शनामध्ये धान्य प्रात्यक्षिके, कृषी संलग्न उद्योजक, महिला बचतगट,
शेतकरी उत्पादक कंपन्यांचे स्टॉल लावण्याची व्यवस्था व उत्पादक ते ग्राहक थेट विक्री केंद्र धान्य महोत्सव भरड धान्य विक्रेत्यांचे स्टॉल बाबत नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुंभार यांनी जिल्हा कृषी महोत्सवाच्या आयोजन संदर्भात आयोजित बैठकीत दिले. बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी.,करी सन्मान समारंभ व समारोप सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे, प्रकल्प संचालक आत्मा डॉ. मुरली इंगळे जि.ग्रा.वि.यो. प्रकल्प संचालक मनोज जाधव, जिल्हा रेशीम अधिकारी सुनील दत्त फडके, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. उमेश चिंचमलानपुरे, कृषी विकास अधिकारी मिलिंद जाधव, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय विनोद राठोड, नितीन गोरे, डॉ. गोपाल मंजुळकर, मकरंद सरकटेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजना, उपक्रमांची माहिती, संशोधित कृषी तंत्रज्ञान नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषी पूरक व्यवसाय इत्यादी बाबतचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे.
कृषी प्रदर्शन, कृषी विषयक परिसंवाद आणि अनुभवी शेतकरी, उद्योजकांची व्याख्याने, यशस्वी शेतकरी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व विचारवंत यांची थेट भेट घडावी व सामान्य शेतकऱ्यांना शंका निरसन करुन घेता यावे.
यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कृषी महोत्सवाचे उद्घाटन व मार्गदर्शन, दुसऱ्या दिवशी परिसंवाद व तिसऱ्या दिवशी शेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.