Akola : शेतकऱ्यांची दसरा-दिवाळी होणार गोड!

अतिवृष्टीचे १३० कोटी प्राप्त; एक लाख चार हजार शेतकऱ्यांना दिलासा
crop damage
crop damageesakal
Updated on

अकोला : अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे जून ते जुलै दरम्यान ९० हजार ६६५ तर ऑगस्टमध्ये सात हजार ६५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करून अहवाल शासनाला सादर केला होता.

त्यानुसार शासनाच्या महसूल व वन विभागाने अकोला जिल्ह्यातील शेती नुकसानीचा १३० कोटी नऊ लाख ५३ हजार रुपयांचा निधी ता. ८ सप्टेंबर रोजी मंजूर केला होता. हा निधी मंगळवार, ता.२० रोजी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या निधीचे तालुकानिहाय वितरणाचे आदेश बुधवारी देण्यात आले. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांची दसरा-दिवाळी गोड होणार आहे.

जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात जून ते ऑगस्ट दरम्यान दमदार पावसाने हजेरी लावली त्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी व नाल्यांना पूर आल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले तर काही भागातील शेती पीक खरडून सुद्धा गेले. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने युद्ध पातळीवर पंचनामे केले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीआरएफ च्या निकषानुसार सुधारित शासन निर्णय जारी केला. त्यामुळे पुन्हा सुधारित संयुक्त अहवाल शासनाला सादर करण्यात आला.

यामध्ये जून ते जुलै दरम्यान ९० हजार ६६५ हेक्टरवर तर ऑगस्टमध्ये सात हजार ६५६ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले असून, एका लाखाच्या वर शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. नुकसानग्रस्तांसाठी जून ते जुलै चा १२३ कोटी ६२ लाख ८८ हजार ९८४ रुपये व ऑगस्टमधील नुकसानभरपाईसाठी १० कोटी ४१ लाख २९ हजार ८० रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार १३० कोटी ९ लाख ५३ हजार नुकसान भरपाई प्रशासनाला प्राप्त झाली लवकरच संबंधित तहसीलच्या खात्यात हा निधी वळता करून शेतकऱ्यांच्या मदत मिळणार आहे.

असे आहे मदतीचे स्वरुप

 जिरायत क्षेत्र -पावसामुळे जिल्ह्यातील एक लाख चार हजार ५६३ शेतकऱ्यांचे ९ हजार ४७९.९४ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते. त्यासाठी शेतकऱ्यांना १२३ कोटी ५ लाख २७ हजार रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे.

 आश्वासित सिंचनाखालील क्षेत्र- या क्षेत्रातील १३० शेतकऱ्यांचे १०१.२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी २७ लाख ३२ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आहे.

बहुवार्षिक पिकाखालील क्षेत्र:पावसामुळे १९५ शेतकऱ्यांचे ८४ कोटी १५ लाख रुपयांचे बहुवर्षिक पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाळी ३० लाख २९ हजार रुपये शासनाने मंजूर केले आहेत.

 जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील १ लाख ४ हजार ८८८ शेतकऱ्यांचे एकूण ९ हजार ६६५.२९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी १२३ कोटी ६२ लाख ८८ हजार रुपये शासनाने मंजूर केले आहेत. त्यामध्ये जिरायती क्षेत्र, आश्वासित सिंचनाखालील क्षेत्र, बहुवार्षिक पिकाखालील क्षेत्राचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.