अकोला : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवरुन अनेक उपाययोजना सुरू आहेत. त्यानंतर सुद्धा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्याऐवजी सुरूच असल्याचे विदारक वास्तव आहे.
जानेवारी ते मे ऑगस्ट २०२२ या आठ महिन्याच्या काळात सुद्धा जिल्ह्यातील ८६ शेतकऱ्यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. नापिकी, कर्जाचा वाढता बोजा व शेतमालाला भाव न मिळाल्याने येणारे सुलतानी संकट आदी कारणांच्या विवंचनेतून संबंधित शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले आहे. त्यापैकी ३३ आत्महत्या प्रकरणांना शासकीय मदतीला पात्र ठरविण्यात आले आहे, तर चार शेतकऱ्यांना अपात्र ठरवून ४९ प्रकरण चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.
शेतीसाठी काढलेले कर्ज, उत्पादन दिसत असले तरी शेतमालाचे न परवडणारे दर, नापिकी व इतर कारणांमुळे त्रस्त झालेले शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे चित्र जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध कल्याणकारी याेजना शेतकरी आत्महत्या राेखण्यासाठी अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. आठवड्यात तीन-चार दिवसाआड सरासरी एक शेतकरी आत्महत्या हाेत असल्याचे सरकारी आकडे सांगत आहेत.
२०१५ मध्ये शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आकडा दाेनशेजवळ पाेहचला हाेता. त्यानंतरच्या वर्षांत सुद्धा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दीडशेच्या खाली पाहायला मिळाले नाही. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस व शेतमालाचे चांगले उत्पादन हाेत आहे. परंतु त्यानंतर सुद्धा शेतकरी आत्महत्येच्या घटना सुरूच आहेत. शेतकरी आत्महत्याच्या घटना बघून शेती व शेतकऱ्यांची स्थिती गंभीर असल्याचे लक्षात येते.
याेजनांच्या लाभापासून शेतकरी लांबच!
शेतकरी आत्महत्या राेखण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी याेजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये प्रेरणा प्रकल्प, बळीराजा चेतना अभियान, अन्न सुरक्षा याेजना, महात्मा फुले जन आराेग्य याेजना, छत्रपति शिवाजी शेतकरी सन्मान योजना, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना तथा जिल्हा प्रशासनाच्या बंद पडलेल्या ‘दिलासा’ अभियानाव्यतिरीक्त इतरही याेजनांचा यात समावेश आहे, असे असल्यानंतर सुद्धा शेतकरी आत्महत्येच्या घटना कमी हाेत नसल्याचे दिसून येत आहे.
शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणांवर दृष्टीक्षेप महिना एकूण आत्महत्या
जानेवारी १०
फेब्रुवारी १३
मार्च १३
एप्रिल १२
मे १२
जून ११
जुलै ०९
ऑगस्ट ०६
एकूण ८६
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.