Akola : रेल्वे उड्डाणपूलावर जीवघेणे खड्डे; उद्‍घाटनाविना सुरू करण्यात आलेल्या या उड्डाणपुलाची कथा मोठी रंजक

वाहनधारकांना करावी लागते कसरत; संबंधितांचे दूर्लक्ष
Akola
AkolaSakal
Updated on

अकोट - शहराच्या सौंदर्यात भर घालणारा अकोला नाक्यावरील रेल्वे उड्डाणपूल आता खड्ड्यांमुळे वाहनधारकांसाठी चांगलाच डोकेदुखी ठरला आहे. अशातच अकोटवरून अकोलाकडे जाताना उतरणीच्या भागात पुलावर काही ठिकाणी जीवघेणे खड्डे निर्माण झाल्याने अनेक जणांना जायबंदी व्हावे लागत आहे.

त्यामुळे पूल उतरतांना पडलेल्या खड्ड्याची लवकरात लवकर डागडुजी करण्याची मागणी नागरिकांसह वाहनधारकांकडून केल्या जात आहे.

Akola
Akola : जिल्ह्यात पावसाची शक्यता; नदीकाठच्या गावांना इशारा

उद्‍घाटनाविना सुरू करण्यात आलेल्या या उड्डाणपुलाची कथा मोठी रंजक आहे. पूल वाहतुकीस सुरू झाला तेव्हा अल्प काळातच पुलाचा काही भाग एका बाजूला खचलेला आढळला. याबाबत वृत्तपत्रांमध्ये वृत्त प्रकाशित होताच संबंधित यंत्रणेने रातोरात ठिगळ लावून आपले पाप झाकण्याचा प्रयत्न त्यावेळी केला होता.

आता पुन्हा या पुलावरून खाली उतरताच रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात दररोज अपघात घडत आहेत. अकोटवरून अकोलाकडे जाणारा हा मार्ग अतिशय वर्दळीचा. रात्रंदिवस या मार्गावरून अवजड वाहनांसह बसेस, लहान-मोठी चारचाकी वाहने, दुचाकींसह इतर वाहनांची रहदारी सुरू असते. गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूल उतरणीच्या भागात पाणी साचल्याने खड्डा पडला आहे.

Akola
Mumbai Dam News : मुंबईकरांना दिलासा; सातही तलावांमध्ये 80 टक्के पाणीसाठा

त्यामुळे दररोज वाहन या खड्ड्यात आदळत असून, अनेक जण जायबंदी झाले आहे. संबंधित विभाग निवेदने दिल्याशिवाय कुठलीही दखल स्वतः घेत नाही. त्यामुळे या खड्ड्यात एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा संबंधित विभाग पाहतो का?, असाही सवाल आता अकोटवासियांकडून उपस्थित केला जात आहे.

गावाची पारख ही रस्त्यावरून केली जाते असे म्हणतात. पाहुण्यांना अकोट शहरात प्रवेश करतांनाच उड्डाण पुलावरील खड्ड्यात आदळून जर शहरात प्रवेश करावा लागत असेल, तर अकोट शहराचा विकास हा विकास महर्षीच्या काळात किती आणि कसा झाला याचाही चर्चा शहरात रंगत आहे.

Akola
Mumbai-Pune Expressway : 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर कंटेनर पलटला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प

शहरात वाहतुकीची महत्त्वपूर्ण जबाबदारी हा उड्डाणपूल पेलतो. मात्र, याच उड्डाणपुलावरून खाली उतरताना अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.

वाहनचालकांना तर हे खड्डे चुकवत मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे संबंधितांनी खड्ड्यांची निदान तात्पुरती का होईना, डागडुजी करावी.

- अशोक चौधरी, अकोट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.