Akola Fire Accident : भंगाराच्या दुकानात अग्नितांडव; आठ दुकाने जळून खाक

सात ते आठ दुकाने जळून खाक; आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी २० तासापेक्षा अधिकाळ झुंज
akola fire accident 8 shop scrap shop also burn akola marathi news
akola fire accident 8 shop scrap shop also burn akola marathi newsSakal
Updated on

अकोला : शहरातील गजबजलेल्या बाजारपेठ परिसरातील फतेह चौक ते दीपक चौकादरम्यान शास्त्री स्टेडियमला लागून असलेल्या अमन स्क्रॅपसह सात ते आठ दुकानांमध्ये शुक्रवारी पहाटे अग्नितांडव बघावयास मिळाले. यात लाखो रुपयांचे भंगार जळून खाक झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभागाला २० तासांपेक्षा अधिक काळ झुंज द्यावी लागली. आग विझविण्यासाठी २५ बंबांचा वापर करण्यात आला.

एकीकडे दिवाळी बाजार आणि दुसरीकडे अकोला क्रिकेट क्लब मैदनावर फटाका बाजार. मध्ये आगीने रौद्ररुप धारण केल्याने शुक्रवारी पहाटे एकच खळबळ उडाली. पहाटे ५.३० वाजत भंगार दुकानांमधून धुराचे लोट निघू लागल्याने परिसरात असलेल्या नागरिकांना दिसले.

बाजूलाच फटाका बाजार असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण फसरले. तातडीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. एकापाठोपाठ एक बंब घटना स्थळावर पोहोचत होते.

मात्र, भंगारातील प्लॉस्टिकने आग पकडली असल्याने शर्यतीचे प्रयत्न करूनही आग विझत नव्हती. सायंकाळी ५ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभागाचे २५ बंब लागलेत. त्यानंतरही प्रयत्न सुरू होतेच.

बाजूलाच फटाका मार्केट

अकोला क्रिकेट क्लब मैदानावर दिवाळीनिमित्ताने फटाका बाजार भरतो. या बाजारापासून ३०० ते ४०० मीटरवर असलेल्या शास्त्री स्टेडियमला लागून भंगाराच्या दुकानांना आग लागली. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले होते.

रस्त्यावरील दुकानांमुळे आग विझविण्यात अडचण

अग्निशमन विभागाचे बंब सिटी कोतवाली चौकातील हायड्रंडवरून भरले जातात. येथून गांधी रोडमार्गे फतेह चौकापर्यंत पोहोचता येते. मात्र, दिवाळी बाजारातील दुकाने खुले नाट्यगृह ते फतेह चौकापर्यंत रस्त्यावरच थाटण्यात आली आहे.

गांधी चौकातही दुकाने थाटली आहेत. त्यामुळे या मार्गावरून बंब आग विझविण्यासाठी पाठविता आले नाही. बंब टिळक रोडवरून अकोट स्टँडमार्गे घटनास्थळापर्यंत लांबच्या रस्त्याने पाठवावे लागले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विलंब झाला.

आगीच्या कारणाबाबत संभ्रम

शास्त्री स्टेडियमला लागून असलेल्या भंगार दुकानांमध्ये लागलेल्या आगीच्या कारणाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आगीसाठी फटकाही कारणीभूत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, या भंगाराच्या दुकानांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे आग लागते. त्यामुळे ही भंगाराची दुकाने वस्तीपासून लांब नेण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.