अकोला : 'एड्स' नियंत्रण कार्यक्रमात जिल्हा राज्यात प्रथम

चार वर्षांपासून सलग उत्कृष्ट कामगिरी
HIV
HIVsakal
Updated on

अकोला : राज्य एड्स नियंत्रण कार्यालय मुंबई मार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या एड्स नियंत्रण कार्यक्रमाची सन् २०२१-२२ ची आकडेवारी एकत्रित करण्यात आली. या आकडेवारीच्या आधारावर अकोला जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. अकोला जिल्हा हा एड्स नियंत्रण कार्यक्रमात सलग चार वर्षांपासून राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

काही वर्षांआधी एचआयव्ही एड्स नावाच्या भस्मासुराने अवघा देश ढवळून काढला होता, मात्र अवघ्या काही वर्षांत एचआयव्ही एड्सच्या संदर्भात घडून आलेले बदल अचंबित करणारे आहेत. जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण पथकाच्या कामगिरीमुळे आणि वारंवार हाेणाऱ्या जनजागृतीमुळे भितीदायक अशा या आजाराच्या प्रमाणात घट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात २०१४ पासून या जीवघेण्या आजाराच्या रुग्णांची संख्या कमी हाेताना दिसत आहे.

सन् २०२१-२२ मध्ये जिल्ह्यात २५३ रुग्णच एड्स बाधित आढळले. त्यामुळे एड्सला थांबवण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचे सुखद चित्र दिसून येत आहे. दरम्यान जिल्ह्यात एड्स नियंत्रणाचे कार्य अधिक वेगाने व तत्परतेने होत असल्याने एड्स नियंत्रण कार्यक्रमात अकोला जिल्हा हा राज्यात यंदाही गत तीन वर्षांप्रमाणे प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाता तुरा खोवला आहे.

आई एड्स बाधित, तर बाळ निगेटिव्ह

जिल्ह्यात १ लाख २८ हजार ६०२ इतक्या एचआयव्ही चाचण्या करण्यात आल्या. ज्यामध्ये २५३ रूग्ण एचआयव्ह बाधित आढळले. सन् २०२१-२२ मध्ये जिल्ह्यात २१ गर्भवती माता व २३२ सामान्य व्यक्तींना एचआयव्हीची बाधा झाली. जिल्ह्यात एकूण २१ पैकी ११ एचआयव्ही बाधित गर्भवती मातांची प्रसूती झाली असून सर्वच ११ बाळांची एड्स नियंत्रण कार्यक्रमात नोंद करण्यात आली आहे. या बालकांपैकी एकाही बाळाला एचआयव्हीची बाधा झालेली नाही. त्यांचा पुढील पाठपुरावा सुरू आहे.

जिल्ह्यात ५७ ठिकाणी तपासणीची सुविधा

जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर एकूण ५७ केंद्रांवर एचआयव्ही तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त दोन केंद्रांमार्फत एचआयव्ही बाधित रुग्णांना औषधोपचार दिला जातो. तळागळापर्यंत एचआयव्ही प्रतिबंधात्मक सुविधांचा विस्तार करण्यासाठी जिल्ह्यात गुणवंत शिक्षण संस्था, लिंग वर्कर योजना, विहान प्रकल्प अशा अशासकीय संस्थांनी कोविड काळात रूग्णसेवा घराघरात पोहचविण्याचे महत्वाचे काम केले आहे.

उत्कृष्ट काम करणारे पाच जिल्हे

जिल्हा टक्केवारी

  • अकोला ९४.५

  • लातूर ९१.९

  • जळगाव ९१.५

  • धुळे ९०.२

  • बुलढाणा ८९.८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.