आगर : गत तीन चार दिवसांपासून आगर परिसरात पाऊस सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजतापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नदी- नाल्यांना पुर आला. पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने असंख्य वाहने अडकून पडली होती. गावातील सखल भागात पाणी साचले. रस्ते जलमय झाले तर काही घरांमध्येही पाणी शिरले.
आगर परिसरात रविवारपासून पाऊस सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता दरम्यान सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदीसह चोंडा, मोळखंड, चिचखेडा, लेंडी नाल्याला पूर आला. हातरुण, सिगोली रस्त्यावरील नाल्याला पूर आला. या पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने वाहतुकीची कोंडी झाली. मुसळधार पावसाचा जोर रात्रीही कायम होता. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत वाहने अडकून पडली होती.
लेंडी नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात
दमदार पावसामुळे आगर गावच्या मध्यभागी असलेल्या लेंडी नाल्याला रात्री ८ वाजता पूर आला. या पुराचे पाणी अनेक नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे नागरिकांच्या घरातील अन्नधान्य, घरातील सर्व वस्तू पाण्यात भिजल्या. नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.
दर्शनासाठी गेलेले भाविक अडकले!
या परिसरातील नागरिक गुरुवारी मोठ्या प्रमाणात शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जातात. या पावसामुळे अनेक ठिकाणी पुलावरून पाणी असल्याने शेगाव येथील दर्शन होऊन परत येताना कारंजा रजमजाणूपर, हातरुण, आगर, पाळोदी येथील ग्रामस्थांना रस्त्यावर अडकून बसावे लागले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.