अकोला : कोविडच्या जेएन-१ या व्हेरियंटचा जगभर वेगाने प्रसार होत आहे. राज्यात देखील या व्हेरियंटचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने आवश्यक सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जीएमसीच्या अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक व महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांनी लेखी आदेशच जारी केले आहेत.
राज्यासह जिल्ह्यात गत तीन साडेतीन वर्षा आधी कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला होता. या विषाणूमुळे अनेकांना जीव गमवावा लागला, तर अनेक जण कोरोना बाधित झाल्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या उपचार पद्धतीने स्वतःचा जीव वाचवाला लागला. राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या या विषाणूचे ओमायक्रॉन या परिवर्तित रूपाने नंतरच्या काळात डोके वर काढले.
या विषाणूचा संसर्ग वेग अधिक असल्याने त्यामुळे बाधित होणाऱ्यांची संख्या अधिक होती, परंतु मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होती. दरम्यान आता देशात कोरोनाचा नवीन जेएन-वन व्हेरिएंट आढळून आला आहे. महाराष्ट्रातही या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने खबरदारी घेऊन आरोग्य यंत्रणांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सुद्धा आरोग्य विभागाला पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या नव्या व्हेरिएंटचा धोका पाहता जिल्हाधिकारी कुंभार यांनी आरोग्य विभागाला आवश्यक निर्देश दिले आहेत.
औषधसाठा ठेवण्याचे निर्देश
नव्या व्हेरिंयटचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी काही आवश्यक निर्देश दिले आहेत. त्यामध्ये खालील बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील रुग्णालये, आरोग्य केंद्र येथे आवश्यक औषधसाठी उपलब्ध ठेवण्यात यावा. संशयित रुग्णांची कोविड तपासणी करुन याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.सर्व स्तरावर बेड उपलब्ध राहतील याबाबत नियोजन करण्यात यावे.
आवश्यक, पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन साठा उपलब्ध ठेवण्यात यावा. वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक, आरोग्य अधिकारी यांना आवश्यक निर्देश देण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी जीएमसी, जिल्हा परिषद व महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.